Download App

Kaagaz 2 Trailer : सतीश कौशिक यांच्या अखेरच्या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज

  • Written By: Last Updated:

Kaagaz 2 Trailer Release Out: बॉलिवूड (Bollywood) अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा शेवटचा चित्रपट ‘कागज 2’ (Kaagaz 2 )चे पहिले पोस्टर रिलीज केले होते. (Kaagaz 2 Trailer) तर आज या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. व्हीके प्रकाश दिग्दर्शित ‘कागज 2’ (Kaagaz 2 Movie) मध्ये सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांच्यासोबत नीना गुप्ता, स्मृती कालरा आणि दर्शन कुमार हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Kaagaz2 | Official Trailer | Anupam Kher, Darshan Kumaar, Satish Kaushik, Smriti Kalra, Neena Gupta

ट्रेलरमध्ये नेमकं काय आहे: या 2 मिनिट 25 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये, राजकीय रॅली आणि रस्त्यावरील निदर्शने यामुळे ट्रॅफिक जाम कसा होतो आणि लोकांना त्याचा कसा त्रास होतो हे पाहता येईल. हे असे मुद्दे आहेत ज्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हेच या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला अनुपम खेर एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत, जो सतीश कौशिकची केस कोर्टात मांडणार आहे. पुढे, एका नेत्याच्या रॅलीमुळे कशी ट्रॅफिक जाम होते आणि त्यामुळे सतीश कौशिक आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत, हे पाहिले जाते. सतीश कौशिक यांची मुलगी घरी अचानक कोसळते आणि वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने तिचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत सतीश कौशिक आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी ही केस लढताना चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

अनुपम खेर यांनी एक भावनिक संदेश लिहिला: अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया (social media) हँडल इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘प्रिय सतीश कौशिक. तुमच्या पॅशन प्रोजेक्टचा ट्रेलर आणि दुर्दैवाने शेवटचा प्रोजेक्ट ‘कागज 2’ उद्या रिलीज होणार आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी आपण किती मेहनत घेतली हे मला माहीत आहे, पण आता या चित्रपटाची चमक जगभर पोहोचेल याची मला खात्री आहे.

CM शिंदेंसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाले, ‘शेतकऱ्याच्या कुटुंबातून…’

चित्रपट कधी प्रदर्शित होणार: व्हीके प्रकाश दिग्दर्शित, सतीश कौशिक, रतन जैन आणि गणेश जैन निर्मित, हा चित्रपट सतीश कौशिक एंटरटेनमेंट एलएलपी आणि व्हीनस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांची संयुक्त निर्मिती आहे. हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us