Download App

Khakee: तब्बल 20 वर्षांनी येणार ‘खाकी’चा सीक्वल; बिग बींसह दुसऱ्या भागात कोण- कोण झळकणार?

Khakee Movie Sequel: तब्बल 20 वर्षांपूर्वी दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘खाकी’ (Khakee Movie) हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘कल हो ना हो’ च्यासोबत प्रदर्शित होऊन देखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) मोठा धमाका केल्याचे सांगितले जात होते. आता या सिनेमाच्या सीक्वलची जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या सीक्वलची जबरदस्त चर्चा ऐकायला मिळत आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, तुषार कपूर, ऐश्वर्या राय, अजय देवगण, अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर दिवंगत निर्माते केशू रामसे यांचे सुपुत्र अभिनेता व निर्माता आर्यमन रामसे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत या या संबंधात पुष्टी केली. तब्बल 20 वर्षांनंतर ‘खाकी’चा सीक्वल बनणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आर्यमन रामसे म्हणाले की, “हो आम्ही ‘खाकी’च्या सीक्वलच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. आमच्याकडे एक मूळ कथा तयार आहे. पुढच्या वर्षापर्यंत या सिनेमावर काम सुरू होणार आहे, अशी आशा आहे. तसेच याहून अधिक माहिती त्यांनी दिली नसली तरी ही एक नवीन कथा असणार आहे, जी आजच्या काळाशी सुसंगत असणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीची ‘नंदिनी’ आता ओटीटीवर प्रदर्शित

मूळ सिनेमातील अक्षय कुमार, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांनी साकारलेली भूमिका मृत्युमुखी पडलेली असल्याने या नव्या भागाच्या कास्टिंगबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जसं कथेचं काम पूर्ण होईल, त्यावेळेस या सिनेमात नेमकं कोणाला घेता येणार आहे, यावर विचार करण्यात येणार असल्याचे निर्मात्यांनी यावेळी सांगितले आहे. बिग बीं आणि तुषार कपूर यांच्याशी याबद्दल चर्चा करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषीच करणार असल्याचंचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us