Gadar 2 Collection: सनी पाजीच्या ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा; २२व्या दिवशी कमावले इतके कोटी

Gadar 2 Collection: सनी पाजीच्या ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा; २२व्या दिवशी कमावले इतके कोटी

Gadar 2 Box Office collection: गदर२ (Gadar 2 ) हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास १ महिना होत आला. (Box Office collection) परंतु सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांची मात्र गर्दी कमी झाली नाही. यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेला ‘गदर २’ हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमात अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)


सिनेमा प्रदर्शित होऊन २२ दिवस उलटले आहेत. परंतु सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच अभिनेता किंग खानचा ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तरी देखील सिनेमाच्या कमाईमध्ये आजिबात घट झाली नाही. गदर २ने शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या २२व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर ४ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आता पर्यंतचे सिनेमाचे हे सर्वात कमी कलेक्शन आहे.

आता सिनेमा विकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी जोरदार कमाई करण्याची शक्यता वसरतवसली जात आहे. सिनेमाने २२ दिवसामध्ये एकूण ४८१.२५ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सुपरहिट सिनेमा ठरत आहे. गदर २ने हटके कमाई केली आहे. परंतु अजून देखील काही सिनेमा आहेत ज्याचे गदर२ रेकॉर्ड तोडू शकले नाही.या यादीमध्ये नेमके कोणते सिनेमा आहेत.

Maratha Reservation: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “मराठा आरक्षण…”

बाहुबली २- १०३०.४२ कोटी रुपये, केजीएफ २- ८५९.७ कोटी रुपये, आरआरआर- ७८२.२ कोटी रुपये, पठाण- ५४३.०९ कोटी रुपये, गदर २- ४८१.२५ कोटी या सिनेमाचा गदर२ ने आजून देखील रेकार्ड तोडू शकला नाही. ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सिनेमा २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी आमिर खानचा लगान हा सिनेमा देखील प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी ‘गदर’ आणि ‘लगान’ हे दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर बघायला मिळाली होती. यावेळी देखील ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ‘ओएमजी २’ या सिनेमाची टक्कर बघायला मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube