Mission Impossible 7 सह सिनेमा गृहात रिलीज होणार किंग खानच्या ‘जवान’चा ट्रेलर

Jawan Trailer Release Date: पठाणनंतर (Pathaan) किंग खान त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) सिनेमामुळे चांगलंच चर्चेत आला आहे. याअगोदर देखील या सिनेमाच्या टीझरच्या चर्चा चांगल्या रंगल्या आहेत. सिनेमाचं टीझर ७ जुलै किंवा १५ जुलै रोजी रिलीज होण्याची श्कुयता वर्तवली जात आहे. परंतु आता या सिनेमाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. No teaser, Direct theatrical Trailer […]

Jawan Trailer

Jawan Trailer

Jawan Trailer Release Date: पठाणनंतर (Pathaan) किंग खान त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) सिनेमामुळे चांगलंच चर्चेत आला आहे. याअगोदर देखील या सिनेमाच्या टीझरच्या चर्चा चांगल्या रंगल्या आहेत. सिनेमाचं टीझर ७ जुलै किंवा १५ जुलै रोजी रिलीज होण्याची श्कुयता वर्तवली जात आहे. परंतु आता या सिनेमाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

पठाणच्या (Pathaan) रिलीज डेटनंतर आता किंग खानचे चाहते त्याच्या जवान या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार किंग खानच्या (King Khan) ‘जवान’ सिनेमाचा टीझर नाही तर थेट ट्रेलर रिलीज होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. होय, या सिनेमाचा दमदार ट्रेलर १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. १२ जुलै रोजी जवान या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्याचा निर्णय सिनेमा निर्मात्यांनी घेतला आहे. या सिनेमाचा ट्रेलर ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग पार्ट वन’सोबतच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या बातमीने किंग खानचे चाहते देखील खूप खुश दिसत आहेत. दरम्यान जवान रिलीज होण्याच्या २ महिन्याअगोदर त्याचे प्रमोशन सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. किंग खानच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर वेळी एक मोठा धमाका करणार आहे. कारण ‘जवान’ सिनेमाचा  ट्रेलर हा ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’सोबत ( Mission Impossible 7 ) सिनेमा गृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. किंग खानच्या ‘पठाण’ सिनेमाच्या ब्लॉकबस्टर शोनंतर त्याच्या आगामी सिनेमाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली आहे.

Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

यामुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. ‘जवान’ सिनेमातून किंग खानचा नवा अवतार चाहत्यांना बघायला मिळणार आहे. ‘पठाण’ सिनेमाप्रमाणेच त्याच्या या आगामी सिनेमाला दमदार प्रतिसाद मिळणार आहे, अशी अपेक्षा आहे. कारण याबद्दल जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेंसचा समावेश आहे. या सिनेमासाठी किंग खानने विशेष मेहनत घेतली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी किंग खानने कमालीचे बॉडी ट्रान्सफर्मेशन केल्याचे बघायला  मिळणार आहे.

Exit mobile version