Jawan: ‘जवान’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने किंग खान भारावला; ट्वीट करत म्हणाला…

Jawan: मनोरंजन क्षेत्रातील बाहशाह किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ (Jawan) सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. (Social media) अखेर जवान आज ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल जबरदस्त क्रेझ […]

Jawan New Song Out

Jawan New Song Out

Jawan: मनोरंजन क्षेत्रातील बाहशाह किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ (Jawan) सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. (Social media) अखेर जवान आज ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल जबरदस्त क्रेझ सध्या बघायला मिळत आहे.

पहाटे ५ वाजल्यापासून हजारो चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून किंग खान देखील चांगलाच भारावून गेला आहे. किंग खानने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. यासाठी किंग खानने ट्वीटरवर (Twitter) एक व्हिडीओ ट्वीट करत चाहत्यांचे आभार मानले आहे.

जवान सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगने अनेक अनोखे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘बुक माय शो’च्या रीपोर्टनुसार संपूर्ण देशभरात जवानची ७५ लाख तिकिटे विकल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने १७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. एकूणच किंग खानचा ‘जवान’ पहिल्या दिवशी देशात ६० ते ७० कोटींचा गल्ला जमवेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं घडल्यास हा एक अनोखा रेकॉर्ड करणारा पहिला सिनेमा ठरणार आहे.

Spruha Joshi: स्पृहा जोशीची कविता चर्चेत; म्हणाली, “तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी…”

या सिनेमात किंग खानच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये किंग खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. हिंदीसोबतच हा सिनेमा तमिळ, तेलगु भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Exit mobile version