Spruha Joshi: स्पृहा जोशीची कविता चर्चेत; म्हणाली, “तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी…”
Spruha Joshi: महाराष्ट्राभर गेल्या जवळपास एका महिन्यापासून आजिबात पाऊस नाही. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा जीव देखील हवालदिल झाला होते. (Social media) अशातच आज राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडास दिलासा मिळाला आहे. परंतु आज जन्माष्टमी देखील आहे. यानिमित्ताने जन्माष्टमी (Janmashtami) आणि पावसाचा संबंध जोडणारी एक छोटीशी कविता अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) शेअर केली आहे.
दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस ?
की पाऊस होऊन येतोस?
सगळं विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेच
पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत!
उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत!
तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला ..
मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला?
त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन.. ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात…
तुझा सारासारविचार टोचला असतास आमच्या बुद्धीला…
आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..
किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस..
असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!
इथली फार काळजी करू नको..
दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्त
बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..
Jawan Release: माहिमच्या थिएटरबाहेर गोविंदांनी थर रचून केलं, किंगच्या जवानचं जोरदार स्वागत
सध्या तिच्या या कवितेचं चाहते जोरदार कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. अनेकांनी अप्रतिम लिहिलंय, असं म्हणत स्पृहाचं तोंड भरून कौतुक केल आहे. तर अनेकांनी पाऊस आल्याने आनंद देखील व्यक्त केला आहे.