Jawan Release: माहिमच्या थिएटरबाहेर गोविंदांनी थर रचून केलं, किंगच्या जवानचं जोरदार स्वागत

Jawan Release: माहिमच्या थिएटरबाहेर गोविंदांनी थर रचून केलं, किंगच्या जवानचं जोरदार स्वागत

Govinda Pathak Welcome To Jawan: किंग खानचा (King Khan) ‘जवान’ आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. (Jawan Hindi Cinema) ‘पठान’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘जवान’ला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे बघायला मिळत आहे. (Social media) तसेच आज दहीहंडीचा सण असल्याने मुंबई मधील एका गोविंदा पथकाने किंग खानच्या ‘जवान’ला अनोख्या पद्धतीने सलामी दिली आहे.

मुंबईमधील माहिमच्या एका सिनेमागृहाबाहेर, गोविंदा पथकाने थर रचून किंग खानच्या ‘जवान’ला एक अनोखी सलामी यावेळी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर गोविंदा पथक सलामी देत असतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. माहिमच्या गैटी गॅलेक्सी सिनेमागृहाबाहेर मुंबईकरांनी चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी करत सिनेमाचं दणक्यात स्वागत केलं आहे.

सिनेमागृहाच्या बाहेर टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव करत या बहुप्रतिक्षित सिनेमाचं जोरदार स्वागत केलं आहे. आज पहाटे माहिमच्या गैटी गॅलेक्सी सिनेमागृहाबाहेर एका गोविंदा पथकाने ५ थर लावत किंग खानच्या सिनेमाला एक अनोखी सलामी दिली आहे. यावेळी उपस्थित चाहत्यांनी व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला आहे.खर तर सिनेमाच्या कमाईवर ट्रेड ॲनालिस्टसह निर्माते देखील लक्ष देऊन आहेत. सिनेमाने पहिल्या दिवशी लाखो तिकीटांची विक्री करत एक अनोखा विक्रम रचला आहे.

Girija Oak: मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाली…

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी भाषेत ‘जवान’ने ५,२९,५६८ तमिळ भाषेत १९,८९९ तेलुगू भाषेत १६,२३० इतक्या तिकीटांची विक्री यावेळी झाली आहे. IMAX फॉरमॅटमध्ये ‘जवान’ सिनेमा बघण्यासाठी ११,५५८ तिकीटांची विक्री करत एक अनोखा विक्रम केला आहे. तसेच सिनेमाची ही तिकीट विक्री बघता ‘जवान’ने ‘पठान’चा देखील विक्रम मोडीमध्ये काढल्याचे बघायला मिळत आहे.

सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत किंग खान म्हणजेच शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या ३ भाषेत‘जवान’ आज सिनेमागृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मितीची धुरा गौरी खान यांनी सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube