Girija Oak: मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाली…

Girija Oak: मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाली…

Girija Oak: बॉलीवूडच्या किंग खान (King Khan) म्हणजेच शाहरुखच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ‘जवान’ आज प्रदर्शित झाला आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित या सिनेमात (Jawan Hindi Cinema) किंग खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य हे सर्व मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा असल्याची बघायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole)


नुकत्याच एका मुलाखतीच्या दरम्यान तिनं ‘जवान’ सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा तो किस्सा यावेळी तिने सांगितला आहे.‘जवान’ सिनेमाच्या निमित्तानं गिरीजा ओकने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला मुलाखतीच्या दरम्यान माहिती दिली. यावेळी तिला विचारण्यात आले की, तुझा ”जवान’ सिनेमाच्या सेटवरचा शूटिंगचा पहिला दिवस कसा होता? नेमकी काय उत्सुकता होती?’ तेव्हा गिरीजा सांगितलं आहे की, “माझ्या शूटिंगचा पहिला दिवस योगायोगाने पुण्यामध्ये होता. आता मी पुण्यात राहत नसले तरी अनेक वर्ष मी पुण्यामध्ये राहिली आहे.

पुण्यामध्ये आमच्या शूटचा पहिला दिवस मेट्रो स्ट्रेशनवर होता. यामुळे स्टेशनवर एक-एक किलोमीटर लांबपासून बॅरीगेटींग होतं. आणि मोजक्याच गाड्या आत येऊ देत होते आणि मोठा गोंधळ देखील होता. खूप ज्युनिअर, खूप मोठा क्राउड होता. पहिल्या दिवशी आपण नेमकं कोणत्या दर्जाच्या सिनेमात काम करणार आहोत, याचा अनुभव आला. अगदी बाहेरपर्यंत सिक्युरिटी होती. आणि आतमध्ये कोणीच कोणाला येऊ देत नव्हतं. खूप तामझाम असं सगळं होतं. यामुळे मला चांगलीच मज्जा वाटत होती. पुढे गिरीजा म्हणाली की, “जेव्हा आम्ही शूट करण्यासाठी मुंबईमध्ये परत आलो होतो, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने पहिला दिवस मी किंग खानला भेटले.

Jawan Leaked: किंग खानचा ‘जवान’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?

आम्ही पहिल्यांदा सेटवर गेल्यावर आम्हा ६ जणींना त्याने मिठी मारली आणि म्हणाला, ‘धन्यवाद. तुम्ही या सिनेमाचा एक महत्वाचा भाग आहात.’ तो क्षण मी विसरू शकत नाही. कारण मला हे अपेक्षित नव्हतं की, तो सेटवर आल्या आल्या आमचं असं स्वागत करेल. जसं नेहमी काम सुरू होतं, सहकलाकारांना हॅलो, हाय बोलून तसं वाटलं होतं. परंतु तो प्रत्येक जणींकडे येऊन मिठी मारून प्रत्येकाचे आभार मानत होता. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. आम्ही या सिनेमासाठी खूप शूटिंग केलं. जवळपास आम्ही ४५ दिवस चेन्नईमध्ये होतो. आम्ही सगळ्या पोरी एकत्र राहत होतो. यामुळे आम्ही एक वेगळा दंगा केला. अशा प्रकारच्या खूप आठवणी जमा झाल्या असल्याची माहिती अभिनेत्रीने यावेळी सांगितले आहे.

सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत किंग खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ आज अर्थात ७ सप्टेंबर आज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube