King Poster : कातिल नहीं.. आशिक हूं…’, शाहरुख खानने ‘किंग’चा नवा दमदार पोस्टर केला प्रदर्शित

King Poster :  शाहरुख खानने आपल्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ या चित्रपटाचा नवा दमदार पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

King Poster

King Poster

King Poster :  शाहरुख खानने आपल्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ या चित्रपटाचा नवा दमदार पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या पोस्टरमध्ये ॲक्शन, तीव्रता आणि रोमान्स यांचा जबरदस्त मिलाफ पाहायला मिळत आहे. या ॲक्शन थ्रिलरच्या नव्या पोस्टरमध्ये ओठांमध्ये गुलाब धरलेला आणि डोळ्यांत आग असलेला शाहरुख खान एका वेगळ्याच आणि दमदार अंदाजात दिसत आहे. त्याचा हा अनोखा अवतार चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे.

शाहरुख खानने प्रदर्शित केलेल्या या नव्या पोस्टरमधून ‘किंग’ चित्रपटाची भव्यता आणि त्याचा लार्जर-दॅन-लाइफ अंदाज स्पष्टपणे जाणवतो. सुपरस्टारला त्याच्या या नव्या अवतारात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर का आहेत, याची आणखी एक झलक या पोस्टरमधून पाहायला मिळते.

सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मरफ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. ‘किंग’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली? टोरंट पॉवर प्रकल्पाला विरोध वाढला

Exit mobile version