Arjun Ustara Film Updates : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिने रणबीर कपूरसोबत ‘ॲनिमल’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तृप्तीच्या व्यक्तिरेखेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आणि तिला लोकप्रियता मिळवून दिली. आता तृप्ती डिमरी पहिल्यांदाच शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली. त्यांनी विशाल भारद्वाजचा (Vishal Bhardwaj) ‘अर्जुन उस्तरा’ (Arjun Ustara) हा ॲक्शनपट साईन केला आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे
तृप्ती डिमरी आणि शाहिद कपूर हे दोन्ही स्टार्स विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’ या ॲक्शनपटात एकत्र दिसणार आहेत. विशालचा हा चित्रपट अभिनेत्रीने साईन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले आहे आणि येत्या 6 जानेवारी 2005 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या प्रोजेक्टसाठी खास एक मोठा स्टुडिओ तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
Abu Azmi : अजित पवारांची मोठी खेळी, अबू आझमी ‘मविआ’ तून बाहेर
यापूर्वी शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांनी रंगून, कमिने आणि हैदर यांसारख्या चित्रपटात काम केले होते.
आता अर्जुन उस्तरा हा चित्रपट स्वातंत्र्योत्तर काळातील अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. या चित्रपटाचे शूटींग लवकरच पूर्ण करून 2025 मध्येच हा भव्य चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
तृप्ती डिमरीसाठी 2024 हे वर्ष खूप खास ठरलं. तिच्या दमदार चित्रपटांमुळे ती सतत चर्चेत राहिली आणि तिला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून देखील खूप कौतुक मिळाले. याचबरोबर तिच्या प्रभावी अभिनयामुळे तिला IMDb च्या टॉप-रेट अभिनेत्रींमध्ये स्थान मिळाले.
तृप्तीने या वर्षात अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. तिने 2024 ची सुरुवात ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’, ‘बॅड न्यूज’ आणि ‘भूल भुलैया 3’ यासारख्या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली. तर आता ती शाहिद कपूरसोबत ‘अर्जुन उस्तरा’ या आगामी चित्रपटात मन जिंकण्यासाठी सज्ज आहे.