Download App

शाहरुख आणि करण जोहर समलैंगिक संबंध ठेवायचे, गायिकेने केला खळबळजनक दावा

Shah Rukh Khan: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आणि चित्रपट निर्माता करण जोहर कोणत्या कोणत्या कारणाने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहतात

Shah Rukh Khan: बॉलीवूडचा (Bollywood) किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) कोणत्या कोणत्या कारणाने सोशल मीडियावर (Social Media) नेहमी चर्चेत राहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघेही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा (Suchitra).

अभिनेत्री सुचित्राने एका मुलाखतीमध्ये मोठा दावा केला आहे. या दाव्यानंतर शाहरुख खान आणि करण जोहर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये सुचित्राने शाहरुख खान आणि करण जोहर हे समलैंगिक संबंध (gay relationship) ठेवत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. इतकंच नाहीतर तिने तिचा एक्स नवरा कार्तिक हा गे असून त्याने शाहरुख आणि करणसोबत शारिरीक संबंध ठेवले असल्याचा दावा केला आहे.

या मुखातीमध्ये ती म्हणाली, ज्या देशात समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यात आली आहे. त्या देशात बॉलिवूडचे अनेक कलाकार प्रवास करतात. एकदा जेव्हा माझा एक्स पती कार्तिक लंडनला गेला होता, तेव्हा तो शाहरुख खान आणि करणला भेटला होता असा दावा करत ती पुढे म्हणाली, शाहरुख, करण आणि कार्तिक लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते, तिकडे त्यांनी क्रॉस्ड ड्रेस घातले होते. शाहरुख आणि करण जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते असे वावरतात आणि रात्रीचा आनंद घेतात असा दावा तिने या मुलाखतीमध्ये केला आहे.

तर दुसरीकडे सुचित्राच्या या दाव्यानंतर आता कार्तिककडूनही या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यात आला आहे. त्याने म्हटलं आहे की, मला सगळ्या प्रकारच्या लैंगिक संबंधनाचा अभिमान आहे, त्यामध्ये शरमेची गोष्ट नाही. जर मी समलैंगिक असेन तर मी ते आनंदाने स्वीकारेन.

…. तेव्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असा होता अनिल कपूर यांच्या मास्टर प्लॅन

मात्र आतापर्यंत या प्रकरणात शाहरुख खान आणि करण जोहर यांच्या टीमकडून कोणताही स्पष्टीकरण देण्यात आलेला नाही. सध्या सुचित्राच्या या मुलाखीतीची क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यूजर्स या व्हायरल क्लिपवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

follow us

वेब स्टोरीज