…. तेव्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असा होता अनिल कपूर यांच्या मास्टर प्लॅन

…. तेव्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असा होता अनिल कपूर यांच्या मास्टर प्लॅन

Anil Kapoor : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी फिट बॉडी, दमदार अभिनयामुळे चर्चेत असणारा लोकप्रिय अभिनेता अनिल कपूरने (Anil Kapoor) सोशल मीडियावर नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सध्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

अनिल कपूरने सोशल मीडियावर एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत आहे. व्हिडिओमध्ये अनिल कपूर म्हणतो, ” छोट्या भूमिका करून स्टारडम मिळवायचे आहे” अनिल कपूरची ही मुलाखत म्हणजे तो खऱ्या आयुष्यातील ‘फायटर’ असल्याचा पुरावा आहे ज्याने त्यांची सर्व स्वप्ने सत्यात उतरवली आहेत.

बॉलीवूडमध्ये अनिल कपूरने बॅक टू बॅक हिट्स देण्याची स्ट्राइक कायम ठेवली आहे. ‘जुदाई‘, ‘राम लखन’ आणि ‘पुकार’ मधून अनिल कपूर यांनी स्वतःची अनोखी छाप मोठ्या पडद्यावर पाडली आहे. त्यांचा अलीकडील ब्लॉकबस्टर्स ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ ने पुन्हा एकदा अनिल कपूर उत्तम अभिनेता आहे हे दाखवून दिलं.

या दोन ब्लॉकबस्टर्सनी केवळ बॉक्स ऑफिसवरच कमाई केली नाही, तर ते ओटीटी स्पेसमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. इतकंच नाही तर त्याचा प्रोडक्शन व्हेंचर ‘क्रू’ अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

वादळी वाऱ्यामुळे राज्यात पुन्हा होर्डिंग कोसळलं, अनेक गाड्यांचे नुकसान

दरम्यान, तो सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, अनेक अहवालांनी सुचवले आहे की कपूर YRF स्पाय युनिव्हर्समध्ये प्रवेश करत आहे आणि अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ चा देखील भाग असेल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज