Shah Rukh Khan: भर कार्यक्रमात किंग खानचं बायकोबद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत? पाहा Video

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. किंग खानचे नाव बॉलीवुडमधील सुपरस्टार्सच्या पहिल्या यादीत आहे. फक्त किंग खानचं नव्हे तर त्याचे कुटुंबही अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T224733.391

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. किंग खानचे नाव बॉलीवुडमधील सुपरस्टार्सच्या पहिल्या यादीत आहे. फक्त किंग खानचं नव्हे तर त्याचे कुटुंबही अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मनाली जात असते. ते दोघेही सतत चर्चेत येत आहेत.


गौरी खानने (Gauri Khan) बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. गौरी खान ही देशात प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर्सपैकी एक डिझाइनर आहे. आता तिने तिचे स्वतःचे पुस्तक प्रकाशित केल्याचे देखील समोर आले आहे. तसेच मुंबईमध्ये एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गौरीच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मोठ्या दणक्यात संपन्न झाला आहे. किंग खानने स्वतःच्या हाताने त्याच्या बायकोचे ‘माय लाईफ इन डिझाईन’ (My Life in Design) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दिसून आले आहे की, किंग खानने त्याच्या बायकोचे वय चुकीचे सांगितले आहे. काल पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान किंग खानने सर्व चाहत्यांशी मनमोकळे संवाद साधला आहे. तर यासोबतच त्याने पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सर्वांसमोर उत्तमप्रकारे भाषण देखील केले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

परंतु गौरीबद्दल त्याला वाटणारा अभिमान त्याने भाषणातून व्यक्त केला. नवी सुरुवात करायला कुठल्याही वयाची मर्यादा नसते असे सांगत त्याने तिने तिच्या चाळीशीत नवी सुरुवात केली, असे म्हटले आहे. हे वाक्य म्हटल्यावर त्याने थोडावेळ थांबला. किंग खानने आपल्या बायकोचे वय चुकीचे उच्चारल्यावर तिथे उपस्थित सर्वांना हसू अनावर झाले होते. त्याने गौरीकडे पाहताच ती देखील हसू लागली होती. यामुळे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान किंग खानच्या या उत्स्फूर्त भाषणाने सर्वांचीच वाहवा मिळवली आहे. तसेच लवकरच ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) या २ सिनेमामध्ये किंग खान झळकणार आहे.

Exit mobile version