Zinda Banda Song Jawan : बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. त्यात आजच त्याच्या या चित्रपटाचं पहिल गाण रिलीज झालं आहे. त्याच्या या गाण्याचं आणि शायर वसीम बरेलवींशी खास कनेक्शन आहे. हे कनेक्शन काय आहे? जाणून घेऊ… (Shahrukh khans Jawan movie Zinda Banda song connection with Shayar Vasim Barelvi )
दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, संशोधनातून माहिती समोर
शाहरूखच्या गाण्याचं वसीम बरेलवींशी खास कनेक्शन…
गाण्यामुळे चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या गाण्याची खासियत अशी आहे की, या गाण्यात शायर वसीम बरेलवी यांच्या एका शेरचा वापर करण्यात आला आहे. ‘उसूलों पर जहा आंच आए टकराना जरूरी है, जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरूरी है’ या ओळींचा वापर करण्यात आला आहे.
Rohit Shetty च्या खतरों के खिलाडीने मारली बाजी; ठरला नंबर वन रिअॅलिटी शो
एटली दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमात किंग खानच्या लूकचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान आता या चित्रपटातील पहिलं गाणं जिंदा बंदा हे रिलीज झालं आहे. तसेच हे गाणं हिंदी तमिळ आणि तेलूगूमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. तर गाण्याची कोरिओग्राफी जबरदस्त असून शाहरूखसोबत 1000 डान्सर थिरकताना दिसणार आहेत. हे गाणं इरशाद कामिल यांनी लिहिलं असून गाण्याला अनिरूद्ध यांनी संगीत दिलं आहे.
किंग खानचा ‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. किंग खानसह या सिनेमात नयनतारा (Nayanthara), प्रियामणी (Priyamani), विजय सेतुपती हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची हटके झलक या सिनेमात बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.
किंग खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसाअगोदर चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले आहे. जगभरात या सिनेमाने १ हजार कोटींचा टप्पा पार केला होता. आता किंग खान ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे.