Sharad Kelkar : जंगलात हजारो प्राणी रहातात मात्र सगळेच ‘रानटी’ (Raanti) नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्यांना जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात मात्र जेव्हा ह्या हल्ल्याना शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या स्टोरीचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून… “काही ‘रानटी’ असतात आणि काही बनतात. नुकतंच रिलीज करण्यात आलेला या पोस्टरवरून ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अॅक्शनने भरलेला आहे.
प्रेक्षकांना राठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची स्टाईल, थरारक अॅक्शन, जबरदस्त स्टोरी आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट म्हणून शरद केळकरची (Sharad Kelkar) ओळख आहे आणि ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे देखील चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.
या चित्रपटात आपल्या भूमिकेवर बोलताना शरद केळकर म्हणाला की, या चित्रपटामध्ये अधर्मी वृत्तींचा नाश करणार्या विष्णूची भूमिका मी केली आहे आणि या प्रकारची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘रानटी’ मध्ये हा वेगळा रोल करण्याची संधी दिली याचा मला अतिशय आनंद आहे. तर दुसरीकडे चित्रपटातील भव्यपणादाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडली आहे. यापूर्वी दिग्दर्शक समित कक्कड यांनी धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण मध्ये जबरदस्त काम केले आहे. रानटी चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समित कक्कड प्रेक्षकांसाठी नेहमी काहींना काही नवीन विषय घेऊन येतो. समित कक्कडनुसार मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अॅक्शन आणि एंटरटेनमेंट रानटीमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच रानटीमधून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपाने मिळणार असेही ते म्हणाले. रानटी चित्रपट समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ साॅइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे. तर रानटी चित्रपटसाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं फोटोग्राफिक आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.
आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. तसेच दिग्दर्शक समित कक्कड यांनी नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे.
आता कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? ‘आप’मधील ‘या’ पाच नेत्यांची सर्वाधिक चर्चा
त्यामुळे त्यांच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने करत आहे आणि हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ‘रानटी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे नक्की असं पुनीत बालन म्हणाले.