Deprecated: Creation of dynamic property S3_Uploads::$region is deprecated in /var/www/html/letsupp/wp-content/plugins/S3-Uploads/inc/class-s3-uploads.php on line 39

Deprecated: Creation of dynamic property S3_Uploads::$s3 is deprecated in /var/www/html/letsupp/wp-content/plugins/S3-Uploads/inc/class-s3-uploads.php on line 234
आता कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? 'आप'मधील 'या' पाच नेत्यांची सर्वाधिक चर्चा
Site icon Letsupp | मराठी बातम्या, ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज | Marathi News Online

आता कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? ‘आप’मधील ‘या’ पाच नेत्यांची सर्वाधिक चर्चा

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन (Arvind Kejriwal) दिवसांनंतर मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार आहेत. आज केजरीवाल यांनीच तशी घोषणा केली आहे. तुरुंगात बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणुकीनंतरच पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या (New Delhi) खुर्चीवर बसेन. माझ्या जागी दुसरा कुणीतरी मुख्यमंत्री असेल असेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या घोषणेनंतर दिल्लीचा मुख्यमंत्री (Delhi Chief Minister) कोण होणार? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

केजरीवाल म्हणाले, मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय विधायक दलाच्या बैठकीत होईल. निवडणुका होईपर्यंत माझ्यासह मनिष सिसोदिया देखील (Manish Sisodia) कोणतेही पद ग्रहण करणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आम आदमी पक्षातील (AAP) दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जात असलेले मनीष सिसोदिया देखील मुख्यमंत्री होणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दोन दिवसांनंतर मी राजीनामा देईन. त्यावेळी वेळेआधी निवडणूक घेण्याची मागणी मी करणार आहे. जोपर्यंत लोक मला मी प्रामाणिक असल्याचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत मी मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर बसणार नाही अशी घोषणाच आज अरविंद केजरीवाल यांनी केली.

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

मुख्यमंत्रि‍पदासाठी ‘या’ पाच नावांची चर्चा

केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर काही नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आली आहेत. यामध्ये राखी बिडला यांचे नाव आघाडीवर आहे. राखी बिडला या एससी चेहरा आहेत. मागासवर्गीय नागरिकांचा विचार करता पक्षाकडून त्यांना संधी दिली जाऊ शकते. या व्यतिरिक्त दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना याही आघाडीवर आहेत.

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी आतिशी यांना नॉमिनेट करण्यात आले होते. मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला. मुख्यमंत्रि‍पदाच्या रेसमधील तिसरं मोठं नाव सौरभ भारद्वाज यांचं आहे. भारद्वाज सध्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर सरकारची जबाबदारी भारद्वाज यांनी देखील सांभाळली होती.

कैलाश गेहलोत यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. गेहलोत सध्या दिल्ली परिवहन आणि पर्यावरण मंत्री आहेत. या व्यतिरिक्त अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांचंही नाव चर्चेत आहे. अरविंद केजरीवाल पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात आहेत असा दावा भाजपकडून केला जात आहे.

हरियाणाची लढाई ‘आप’ला टफ, केजरीवालांना 5 चॅलेंज; ‘त्या’ घोषणेने केली वाट बिकट?

सहा अटींवर मिळालाय जामीन

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने सहा अटींवर जामीन मंजूर केला आहे. यामध्ये केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकत नाहीत. कोणत्याही सरकारी फाईलवर सही करू शकत नाहीत. खटल्याशी संबंधित कोणतेच वक्तव्य सार्वजनिकपणे करणार नाहीत. दहा लाख रुपयांचा जातमुचलका भरावा लागणार. तपास अडथळे निर्माण करणे किंवा साक्षीदारांना प्रभावित करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाहीत. आवश्यकता वाटल्यास न्यायालयात हजर राहावे लागेल तसेच तपासात सहकार्य करावे लागेल या अटींचा समावेश आहे.

Exit mobile version