मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

  • Written By: Published:
मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

Arvind Kejriwal will resign as CM Post : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. तिहार तुरुंगातून 13 सप्टेंबर रोजी बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज पहिल्यांदा आम आदमी पार्टीच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांच्यासोबत आपचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि आतिशी उपस्थित होते.

Video: मला एका नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर; नितीन गडकरींचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट

पुढील दोन दिवसात मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता आपला निर्णय देत नाही तोपर्यंत त्या खुर्चीवर बसणार नाही. जोपर्यंत जनता म्हणत नाही केजरीवाल प्रामाणिक आहे, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. अरविंद केजरीवालांवर मद्य धोरण घोटाळ्याचा आरोप लागला, ते तुरुंगात गेले होते. त्या काळातही अरविंद केजरीवाल यांनी कधीच राजीनाम्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मात्र आज केजरीवालांनी दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

कोण होणार मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटलं, काही लोक म्हणतात की सुप्रीम कोर्टने लावलेल्या निर्बंधांमुळे मी काम करू शकत नाही. त्यांनीही आमच्यावर निर्बंध लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube