Manish Sisodia : आजारी पत्नीला भेटण्यासाठी सिसोदिया पोहोचले घरी, कोर्टाने दिला केवळ 6 तासांचा अवधी
Manish Sisodia : न्यायालयाच्या परवानगीनंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) शनिवारी तिहार तुरुंगातून आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी घरी पोहोचले. सकाळी दहाच्या सुमारास सिसोदिया पोलिसांच्या वाहनातून मथुरा रोडवरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. कडक पोलीस बंदोबस्तात ते पत्नी सिमा यांच्या भेटीसाठी पोहोचले. न्यायालयाने सिसोदिया यांनी सहा तासांची मुदत दिली आहे.
PM मोदींनी रचलेल्या गाण्याची सातासमुद्रापार किर्ती; प्रतिष्ठीत ग्रॅमी अवॉर्डसाठी मिळाले नामांकन
काल मनीष सिसोदिया यांनी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी राऊस एव्हेन्यू कोर्टाकडे 5 दिवसांची परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने केवळ 6 तासांची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांनी सिसोदियांना शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत त्यांच्या आजारी पत्नीला त्यांच्या घरी भेटण्याची परवानगी दिली.
राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सिसोदिया यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी सांगितले की, जर 5 दिवस शक्य नसेल तर 2 दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत उच्च न्यायालयाने यापूर्वी पत्नीला अशाप्रकारे भेटण्याची परवानगी दिली होती असं सांगितलं. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही, सुनावणीदरम्यान सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या याचिकेला कडाडून विरोध केला.
Land For Job Scam : लालू प्रसाद यादवांचा निकटवर्तीय अमित कात्यालला अटक, ईडीची मोठी कारवाई
याआधी जूनमध्येही दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांना त्यांची पत्नी सीमा यांना भेटण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यावेळी सिसोदियां यांचा पत्नीशी संवाद झाला नाही. सीमा यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते त्यांना भेटू शकले नव्हते. सिसोदिया यांच्या पत्नी ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ने त्रस्त आहेत.
सिसोदियांवर नेमके काय आरोप?
ED आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आरोप केला आहे की दिल्ली सरकारचे 2021-22 चे उत्पादन शुल्क धोरण काही मद्य विक्रेत्यांना अनुकूल होते. यासाठी सिसोदिया यांनी लाच घेतली होती. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे धोरण नंतर रद्द करण्यात आले आणि दिल्लीच्या उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली, त्यानंतर ईडीने सिसोदियाविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला. सिसोदिया यांना मार्चमध्ये उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित अनियमिततेच्या प्रकरणात ईडीने अटक केली होती. सध्या कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120बी, 201 आणि 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7अ, 8 आणि 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.