PM मोदींनी रचलेल्या गाण्याची सातासमुद्रापार किर्ती; प्रतिष्ठीत ग्रॅमी अवॉर्डसाठी मिळाले नामांकन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लिहिलेले ‘अॅबडन्स इन मिलेट्स’ हे गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी फालू शाह आणि त्यांचे पती गौरव शाह यांच्यासोबत हे गाणे लिहिले होते. जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी नामांकनात एखाद्या राजकारण्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या गाण्यातून बाजरी म्हणजेच बाजरीची लागवड आणि धान्य म्हणून त्याची उपयुक्तता यांबद्दल सांगण्यात आले आहे. (Abundance in Millets’ written by Prime Minister Narendra Modi has been nominated for Best Global Music Performance at Grammy Awards 2024.)
पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार, 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. भरडधान्याला देशाच्या आहाराचा मुख्य भाग बनवण्यावर पंतप्रधान मोदी सातत्याने भर देत आहेत. याचाच एक भाग म्हणून मोदी यांनी ग्रॅमी पुरस्कार विजेती फाल्गुनी शाह आणि तिचे पती गौरव शाह यांच्यासोबत बाजरीच्या फायद्यांची जगाला ओळख करून देण्यासाठी एक गाणे लिहिले होते. आता याच ‘अॅबडन्स इन मिलेट्स’ या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्सच्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.
Telangana elections : कॉंग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला हे विसरू नका; केसीआर यांचं टीकास्त्र
‘अॅबडन्स इन मिलेट्स’ हे गाणे 16 जून रोजी रिलीज झाले आहे. हे गाणे रिलीज होण्यापूर्वी फाल्गुनी शाह यांनी स्वतः सांगितले की, हे गाणे मी आणि माझ्या पतीने पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मिळून लिहिले आहे. हे गाणे आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष साजरे करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. फालूच्या म्हणण्यानुसार, हे गाणे जगातील भूक कमी करण्यासाठी आणि अत्यंत पौष्टिक धान्यांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जागरुकता वाढवण्यासाठी रचण्यात आले होते.
‘मोदीजी म्हणतात, मी OBC, पण त्यांचाच जात जनगणनेला विरोध’; राहुल गांधीचं टीकास्त्र
जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी नामांकनात कोणत्याही राजकारणी विशेषत: कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘अबंडन्स इन मिल्ट्स’ या म्युझिक व्हिडिओमध्ये भारतातील बाजरीची लागवड दाखवण्यात आली आहे. भूक दूर करण्यासाठी बाजरी किती महत्त्वाची असू शकते हे यावरून दिसून येते. बाजरी हे भरड धान्य आहे आणि पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा जगभरातील देशांना भरडधान्य पिकवण्याचे आणि खाण्याचे आवाहन केले आहे.