Telangana elections : कॉंग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला हे विसरू नका; केसीआर यांचं टीकास्त्र

  • Written By: Published:
Telangana elections : कॉंग्रेसने आंबेडकरांचा दोनदा पराभव केला हे विसरू नका; केसीआर यांचं टीकास्त्र

Telangana elections : तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतरची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीचा विजय झाला होता. दरम्यान, आता प्रचाराला वेग आला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सभांमधून सातत्याने एकमेकांवर टीका केली जातेय. अशातच आता बीआएसचे नेते आणि मुख्यमंत्री केसीआर यांनी कॉंग्रेसवर जळजळीत टीका केली. कॉंग्रेसनं (Congress) आंबेडकरांचा दोनदा पराभव केला, असं  असं टीकास्त्र त्यांनी डागलं.

आयकर विभागाच्या धाडीनंतर बीडमधील बड्या उद्योगपतीचा भाजपमध्ये प्रवेश 

केसीआर यांचा बीआरएस पक्ष सातत्याने कॉंग्रेसवर टीका करत आहे. तर कॉंग्रेस आणि भाजपकडून विद्यमान सरकारवर टीका केली जातेय. . केसीआर यांच्या हातून सत्ता बळकावण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपकडून चांगलाच जोर लावल्या जातं आहे. त्यामुळं यंदाची निवडणुक चुरशीची होणार आहे. दरम्यान, एका प्रचार सभेत बोलतांना केसीआर म्हणाले की, कॉंग्रेस हा धनदांडग्यांचा पक्ष आहे. कॉंग्रेसने वंचित आणि अनुसुचित घटकांतील लोकांच्या हितासाठी फार काही केलं नाही. मात्र, आमच्या सरकारने सचिवालयाशेजारी बाबासाहेब आंबेडकरांचा १२५ फूट पुतळा उभारला. दलित बंधू योजना लागू करून अनुसूचित जातींना 2000 रुपयांचा लाभ दिला जाईल, असेही ते म्हणाले.

World Cup 2023 : श्रीलंकेला मोठा धक्का; ICC कडून सदस्यत्व रद्द… 

केसीआर म्हणाले, की दलित बंधू योजनेचा लाभ शेवटच्या दलित कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी बीआरएस सरकार काम करत राहील. बाबासाहेबांनी दलितांसाठी खूप संघर्ष केला. मात्र काँग्रेसने त्यांना लोकसभेत येण्यापासून रोखलं आणि त्यांचा पराभव केला. कॉंग्रेसनं दोनदा आंबेडकरांना रोखलं. लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव कुणी हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आंबेडकरांचा विचार समाजात झिरपू नये, यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केल्याची टीकाही केसीआर यांनी केली.

आजही कॉग्रेसमध्ये तिच दडपशाही, तोच भेदभाव आहे. काँग्रेसमध्ये तत्त्वाची एकता नसलेले लोक आहेत. काँग्रेसने खालच्या जातीच्या उत्थानासाठी कुठलेही प्रयत्न केली नाहीत, अशी टीका केसीआर यांनी केली. दरम्यान, केसीआर यांनी केलेल्या टीकेला आता कॉंग्रेस काय प्रत्युत्तर देत, हेच पाहणं महत्वाचं आहे. .

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube