प्रचार रॅलीत BRS खासदारावर जीवघेणा चाकू हल्ला, तेलंगणातील धक्कादायक घटना

  • Written By: Published:
प्रचार रॅलीत BRS खासदारावर जीवघेणा चाकू हल्ला, तेलंगणातील धक्कादायक घटना

Kotha Prabhakar Reddy : तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मेडकचे ​​खासदार आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी (Kotha Prabhakar Reddy) यांच्यावर प्रचाररॅली दरम्यान, जीवघेणा हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर हा चाकू हल्ला केला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा? 

तेलंगणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. तेलंगणात सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही सत्ता मिळविण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही प्रचारावर भर देत आहेत. अशातच खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. सुदैवाने ते यातून थोडक्यात बचावले आहेत.

तेलंगणातील मेडक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांना दुबक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. आज ते दौलताबाद मंडलातील सूरमपल्ली गावात निवडणूक प्रचारासाठी गेले होते. ते एका पुजाऱ्याच्या घरी जात असतांना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. एक अज्ञात व्यक्ती त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी गेला होता. त्यावेळी हल्लेखोराने जवळचा सुरा काढून खासदारावर जीवघेणा चाकू हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, रेड्डी यांच्या पोटावर चाकुने वार करण्यात आले होते.
दरम्यान, रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोराला जमावाने बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सिद्धीपेटचे पोलीस आयुक्त एन स्वेथा यांनी सांगितले की, खासदार हल्लात गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपस्थितींना रुग्णालयात दाखल केलं. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून तो चेप्पेयला विला येथील राजू असल्याचं समोर आलं. दरम्यान, रेड्डी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होत आहेत. यातील शेवटची निवडूक तेलंगणा राज्याची होणार आहे. तेलंगणात विधानसभेच्या 120 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube