Ashok Saraf on Sharad Pawar: अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना काल नाट्यपरिषदेकडून मिळालेला पुरस्कार हा महत्वाचा होता. हा पुरस्कार शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते मिळाल्याचा आनंद आपल्याला झाला आहे शरद पवार माझे आवडते नेते आहेत असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी शरद पवारांचं देखील तोंडभरून कौतुक केलं आहे. नाटककार गो. ब. देवल स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात यावेळी अशोक सराफ यांनी हे वक्तव्य जोरदार चर्चेत आला आहे.
काय म्हणाले अशोक सराफ?
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पुढे म्हणाले की, फणसाळकर साहेब या जमातीने माझ्यावर खूप प्रेम दिले आहे. पोलीस कुठेही मी अडकलो तरी देखील मला सोडून देत असत. एकदा कार चालवत होतो, तेव्हा माझ्यापुढे एक टॅक्सी होती. त्या टॅक्सीने एकाला जोरात येऊन उडवलं. मी त्या माणसाला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. पोलिसांनी केस घेतली, दवाखान्यात डॉ. खेर म्हणून होते. त्यावेळी पोलीस देखील दवाखान्यात आले, आणि मला म्हणाले की, तुम्हाला चौकीत यावं लागणार आहे.
ताडदेव पोलीस स्टेशनला गेलो. तेवढ्यात एक पोलीस उपनिरीक्षक आले. आणि मला म्हणाले, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तो एक वर्षाचा आहे. तुम्ही येता का? आणि लगेच मी तिकडं गेलो आणि त्या मुलाच्या तोंडात पेढा भरवला. नंतर येऊन परत पोलीस ठाण्यात बसलो. रात्रीचे 9 ते 10 वाजले होते. त्या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणात लोक पाहायला आले होते. ही आठवण देखील यावेळी अशोक मामांनी सांगितली आहे.
Ashok Saraf : कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सराफ कुटुंबाने केला रंगकर्मींचा गौरव
पुढे बोलताना अशोक सराफ यांनी सांगितले आहे की, त्यांच्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. हे आनंद शब्दात मांडणं खूप कठीण आहे. एका वर्षात चौथा मिळालेला हा मोठा पुरस्कार आहे. हे पुरस्कार कुठून मिळत आहेत, कुणाच्या हस्ते मिळत आहेत, हे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. शासनाचा मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यावेळी मी थोड महाराष्ट्रासाठी काय तरी केलं असं जाणवलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीच्या संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मंगेशकर फॅमिलीतर्फे मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला, यामुळे माझं मन भरून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.