अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, पवारांना आठवला शोले सिनेमातील पाण्याच्या टाकीवरील प्रसंग

'शोले'मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगिकारतात.

News Photo   2025 11 24T155316.853

अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, पवारांना आठवला शोले सिनेमातील धर्मेंद्र यांचा पाण्याच्या टाकीवरील प्रसंग

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज प्रदिर्घ आजाराने निधन झाले. (Dharmendra) ते 89 वर्षांचे होते. त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना श्रद्धांजलीली वाहिली आहे. या प्रसंगी शरद पवार यांना धर्मेंद्र याचा शोले सिनेमातील पाण्याच्या टाकीवरील प्रसंग आठवला आहे.

Dharmendra : गाड्यांचे शौकीन धर्मेंद्रंनी विकत घेतली होती सर्वसामान्यांच्या स्वप्नातली पहिली कार

काय म्हणाले शरद पवार?

१९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. ‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेला ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे.

अनेक वेळा ‘शोले’मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगिकारतात. ‘धरम वीर’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘मेरा गाँव मेरा देश’ आणि ‘ड्रीम गर्ल’ ह्यासारख्या जवळपास २५० सुप्रसिद्ध कलाकृतीत धर्मेंद्र ह्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील. सिनेसृष्टीच्या ‘धरम पाजीं’ना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व देओल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

Exit mobile version