Download App

ओम राऊतच्या ‘तानाजी’ नंतर मराठी दिग्दर्शकाची मोठी झेप; 16 दिवसांत ‘मुंज्या’ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री

Munjya Box Office Collection Day 17: शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर आपले राज्य करत आहे.

Munjya Box Office Collection Day 17: शर्वरी वाघ (Sharwari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Verma) यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपले राज्य करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तिकीट काउंटरला मोठ्या प्रमाणात गर्दी पडली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून यासोबतच रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्येही ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी या ‘मुंज्या’ने किती कलेक्शन केले चला तर मग जाणून घेऊया?

‘मुंज्या’ने रिलीजच्या 17 व्या दिवशी किती कमाई केली?

‘मुंज्या’मध्ये ना मोठी स्टारकास्ट आहे ना तो मोठ्या बजेटमध्ये बनवला गेला आहे, पण त्याची कथा इतकी दमदार आहे की हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्सकडे खेचले जातात. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरप्राईज पॅकेज ठरला आहे. ‘मुंज्या’ला प्रेक्षकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळाला आहे की रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच त्याचे बजेट वसूल झाले आहे आणि आता तो प्रचंड नफा कमावत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिलीजचा तिसरा आठवडा गाठल्यानंतरही ‘मुंढ्या’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने 4 कोटींचे खाते उघडले. यानंतर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात ‘मुंज्या’ची कमाई 32.65 कोटी रुपये होती.

आता रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या शुक्रवारी 3 कोटी रुपये कमावले असताना, 16 व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या शनिवारी, 83.33 टक्के वाढ दर्शवत 5.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता तिसऱ्या रविवारी म्हणजेच ‘मुंज्या’च्या रिलीजच्या 17व्या दिवशीच्या कमाईचे आकडे आले आहेत.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ने रिलीजच्या 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी 6.75 कोटी रुपये कमवले आहेत. यासह 17 दिवसांत ‘मुंज्या’चा एकूण व्यवसाय आता 103 कोटी रुपयांचा झाला आहे.


2024 च्या अनेक मोठ्या चित्रपटांना ‘मुंज्या’ ने मागे टाकले

अवघ्या 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘मुंज्या’ने यावर्षी रिलीज झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने अक्षय-टायगरच्या 350 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि 200 कोटींच्या अजय देवगणच्या ‘मैदान’पेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे आजीवन कलेक्शन 65 कोटी रुपये असताना, मैदानाची कमाई केवळ 52 कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित होती. तर ‘मुंज्या’ने 17 दिवसांत 83.2 कोटी रुपये कमवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 17 दिवसांत 80 कोटींची कमाई केली आहे.

Munjya मधील सीजीआय पात्र पाहुन शर्वरी भारावली; म्हणाली, हा एक नाट्यमय अनुभव

‘मुंज्या’ 100 कोटींपासून किती दूर आहे?

हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ला कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ आणि पश्मिना रोशनच्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’शी स्पर्धा आहे, पण ‘मुंज्या’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत आहे. 80 कोटींहून अधिक कमाई करणारा ‘मुंज्या’ आता 100 कोटींपासून अवघ्या काही पावलं दूर आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपट हा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे. तथापि, कल्की 2898 एडी देखील 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, त्यामुळे प्रभास स्टारर चित्रपटासमोर ‘मुंज्या’ किती व्यवसाय करू शकतो हे पाहणे बाकी आहे.

‘मुंज्या’चे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. स्त्री (2018), रूही (2021) आणि भेडिया (2023) नंतर दिनेश विजानचा मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा हा चौथा चित्रपट आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

follow us