Download App

VIDEO : अट्टल गुन्हेगारांची खातीर करायला येतोय ‘शातिर’! टीजर प्रदर्शित, सस्पेन्स थ्रीलर चित्रपट लवकरच भेटीला

Shatir The Beginning Movie Released On 23 May : करायला अट्टल गुन्हेगारांची “खातीर”…  घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर…!!! अशा ( Shatir The Beginning Movie) हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर ‘शांतिर The Beginning ‘ आजच्या तरुणाईची कथा सांगणारा असल्याचे टीजर मधून दिसते. हा चित्रपट येत्या 23 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला (Entertainment News) येणार आहे.

शातिर The Beginning या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. शातिर The Beginning च्या टीझरवरून दिसते की, हा आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे. तो कॉलेज तरुणाईमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनांवर भाष्य करणारा असल्याचे दिसतो. पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला ड्रग्ज माफिया कोण? पोलीस या ड्रग्ज माफियाचा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का? आणि नायिकेची या सर्व प्रकरणात भूमिका नेमकी काय? हे जाणून घेण्याची उत्कंठा शातिर The Beginning चा टीजर वाढवतो.

‘ संधी मिळाल्यास…मराठी नाटक आवर्जून बघा’; अभिनेते परेश रावल यांनी सांगितला खास अनुभव

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले की, शांतिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी, त्याविरुद्धचा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

कलाविश्वात शोककळा! प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन

या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह योगेश सोमण, रमेश परदेशी,मीर सरवर, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, अॅड. रामेश्वर गिते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका शातिर The Beginning  मध्ये आहेत. येत्या 23 मे 2025 रोजी शातिर The Beginning हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

follow us