Shilpa Shetty and Raj Kundra Lawyer’s Explanation on Fraud Allegation : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राजकुंद्राच्या विरुद्ध 2022 मध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासांमध्ये तक्रारदाराला त्याचे पैसे प्राप्त झाल्याचे समोर आलं होतं.
मोबाईल यूजर्स, 1 जुलैपासून सिमकार्डबाबतचे ‘हे’ नियम बदलणार, जाणून घ्या सर्वकाही
तसेच या प्रकरणावर शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, तक्रारदाराने 2022 मध्ये माझे अशिल राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये सत्य समोर आले असता देखील तक्रारदाराने न्यायालय समोर पुन्हा तक्रार दाखल करण्याचा पर्याय निवडला.
पोंक्षे पिता-पुत्रांच्या चित्रपटाचे नाव जाहीर; काय जबरदस्त घेऊन येणार? प्रेक्षक उत्सुक
त्यामुळे या घटनेवर दोन वर्षानंतर न्यायालयाने पुन्हा एकदा तपासाचे आदेश देण्यात आले. आम्हाला विश्वास आहे की, सत्याचा विजय होईल. माझ्या अशिलाने गुन्हा केलेलाच नाही. तक्रारदार आणि त्यांच्यातील आर्थिक व्यवहार देखील पारदर्शक आहेत. माझे तक्रारदाराला मिळणाऱ्या व्याजावर काही तक्रार असल्यास त्याबद्दल तक्रार दाखल केली जाऊ शकते. मात्र तो व्यावहारिक वादांच्या अंतर्गत दाखल करावा लागेल. मात्र हा गुन्हा गुन्हेगारीच्या कलमाखाली दाखल करण्यात आल्याने. माझ्या अशिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असंही ते म्हणाले.