मोबाईल यूजर्स, 1 जुलैपासून सिमकार्डबाबतचे ‘हे’ नियम बदलणार, जाणून घ्या सर्वकाही

मोबाईल यूजर्स, 1 जुलैपासून सिमकार्डबाबतचे ‘हे’ नियम बदलणार, जाणून घ्या सर्वकाही

Sim Card Rule Change: आज देशातील अनेकजण घरी बसूनच स्मार्टफोनच्या (Smartphone) मदतीने हजारो रुपयांचे आर्थिक व्यवहार करत आहे तर काहीजण ऑनलाईन शॉपिंग करत आहे. त्यामुळे आज आपल्या जीवनाची स्मार्टफोनशिवाय कल्पना शक्य नाही. मात्र आज या स्मार्टफोनमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिम कार्ड (Sim Card). जर आपल्या स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड नसेल तर आपण या स्मार्टफोनवरून काहीच कार्य करू शकत नाही.

मात्र आता सिम कार्डबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार 1 जुलैपासून देशात सिमकार्डबाबतचे काही नियम बदलणार आहे. याबाबत ट्रायने माहिती दिली आहे.

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, हा नियम मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी संदर्भात आहे. हा नवीन नियम 1 जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बदल विशेषतः सिम स्वॅप स्कॅम थांबवण्यासाठी करण्यात येत आहे.

काय असणार नवीन नियम

ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, जर एका नंबर काही ठराविक कालावधीसाठी बंद राहिला तर मोबाइल ऑपरेटर हे सिम कार्ड निष्क्रिय करू शकतात. सिमचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तर नवीन सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला वैध ओळख आणि पत्ता प्रमाणपत्र आवश्यक आहे. याच बरोबर काही प्रकरणात तुम्हाला बायोमेट्रिक पडताळणी देखील करावी लागेल. याशिवाय आता एखादी व्यक्ती किती सिमकार्ड ठेवू शकते यावरही मर्यादा असणार आहे.

नवीन नियमांनुसार पोस्टपेड कनेक्शन प्रमाणेच आता प्रीपेड सिम कार्ड ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. याशिवाय मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. म्हणजेच आता तुमचा नंबर पोर्ट केल्यावर सात दिवसांपर्यंत इतर कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरला तुमचा नंबर पोर्ट केला जाणार नाही. त्यानंतरच तुमचा नंबर पोर्ट केले जाईल.

मोबाईल यूजर्स या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला तुमचे सिम कार्ड सक्रिय ठेव्याचे असेल तर ते नियमितपणे वापरा. (कॉल, मेसेज किंवा डेटासाठी वापरा)

जर नवीन सिम कार्ड खरेदी करणार असाल तर आवश्यक ओळख आणि पत्ता प्रमाणपत्र सोबत ठेवा. याच बरोबर तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे याची माहिती देखील जाणून घ्या.

जर तुम्ही प्रीपेड सिम वापरत असाल तर ते तुमच्या मोबाइल नेटवर्क ऑपरेटरकडे नोंदणीकृत असल्याची खात्री करा.

शेवटी काय झालं?,’बेगानी शादी मै अब्दुला दिवाना’, शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

जर नंबर पोर्ट करत असाल तर नंबर पोर्ट होण्यापर्यंत दुसरा पर्यायी नंबर वापरा, ज्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीबद्दल माहिती मिळेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज