शेवटी काय झालं?,’बेगानी शादी मै अब्दुला दिवाना’, शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

शेवटी काय झालं?,’बेगानी शादी मै अब्दुला दिवाना’, शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

CM Eknath Shinde : दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) लोकांची मतं मिळवली असा आरोप आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमची सभागृहात चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु विरोधकांची नाही. त्यामुळे ते माध्यमांच्या समोर येऊन खोटं बोल पण रेटून बोल अशी नीती वापरत आहे. जी वस्तुस्थिती नाही ते समोर आणून विरोधक लोकांची दिशाभूल करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर लावला.

पुढे शिंदे म्हणाले, मी तुम्हाला मागील वेळी म्हणालो होतो की अवसान गळेल गळालेलं एक अतिशय गोंधळलेला विरोधी पक्ष आहे. यावेळी मात्र जरातुमच्यासमोर छाती फुगवून आले असतील. ते म्हणत आहे लोकसभेत अपयश मिळाल्याने सत्ताधारी पोकळ अश्वासनं देतील मात्र कोणाचं अपयश? तुम्ही निवडणुकीत मोदींना हरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले, संविधान बदलणार असा खोटा नेरिटिव्ह सेट केला मात्र तरीही तुम्हाला किती जागा मिळाले फक्त 99 याचा अर्थ असा तुम्हाला 240 पर्यंत पोहोचण्यासाठी आणखी 25 वर्ष लागणार असा टोला त्यांनी काँग्रेसला लावला.

मात्र एवढं करून शेवटी काय झालं, मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे विरोधकांची गिरे तोभी टांग उपर या म्हणीप्रमाणे गत झाली आहे. तसेच इथं काहीजणांची तर बेगानी शादी मै अब्दुला दिवाना अशी परिस्थिती आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेतला लावला.

तर ठाकरे गटावर टीका करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही आणि उबाठा 13 जागांवर आमने-सामने होतो त्यापैकी आम्ही सात जिंकले. ही आत त्यांना आलेली सूज आहे परंतु ती नक्कीच उतरेन तुम्हाला जी काही मतं मिळाली आहेत, ती तुम्ही दिशाभूल करून मिळवली अशी टीका शिंदेंनी ठाकरे गटावर केली.

Ajit Pawar : ‘मनुस्मृतीच समर्थन नाही’ अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

तसेच विरोधक सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार पडणार असं म्हणत होते मात्र सरकार मजबूत होत गेलं. त्यानंतर अजित दादा देखील आमच्यासोबत आले त्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं. मग काय तर मुख्यमंत्री बदलणार असं विरोधकांकडून सांगण्यात येत होतो मात्र काय झालं का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज