पुण्यातील आठ जागांचा तिढा सुटला? महायुतीला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा डाव

पुण्यातील आठ जागांचा तिढा सुटला? महायुतीला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा डाव

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील आठ जागांवरुन निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. वरिष्ठ पातळीवर पुण्यातील जागा वाटपांची प्राथमिक चर्चा झाली. यानुसार काँग्रेसला (Congress) तीन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) (NCP) पक्षाला तीन आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाला दोन जागा जागा मिळणार आहेत. (Mahavikas Aghadi has succeeded in solving the rift created for eight assembly constituencies in Pune city.)

नेमक्या कोणत्या जागा कोणाला जाऊ शकतात?

पुणे शहरात पर्वती, कसबा पेठ, कोथरुड, शिवाजीनगर, हडपसर, वडगाव-शेरी, कॅन्टॉनमेंट, खडकवासला असे विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये यातील सहा जागांवर भाजपचे तर दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. 2023 मध्ये झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला. यंदा या आठपैकी शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दावा केला होता. तर पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हक्क सांगितला होता.

मोठी बातमी : दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवालांना झटका; जामीन स्थगित, तुरूंगातून बाहेर येणं लांबलं

या दावेदारींमुळे महाविकास आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. इच्छुक उमेदवारांना नेमकी कोणती जागा कोणाला सुटणार याचा अंदाजच येत नव्हता. पण वरिष्ठ पातळीवर हे जागा वाटप अत्यंत सामंजस्याने पार पडले आहे. तीनही पक्षांच्या प्राथमिक चर्चेनुसार कसबा, पुणे कॅन्टोमेंट आणि शिवाजीनगर या जागा काँग्रेसकडे असणार आहेत. तर खडकवासला, पर्वती, हडपसर या जागा राष्ट्रवादीला असणार आहेत. कोथरूड आणि वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनाला सोडण्यात येणार आहेत.

कोण असू शकतात उमेदवार?

हडपसर आणि वडगाव -शेरी या दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. हडपसरमध्ये पवारांकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक योगेश ससाणे हे इच्छुक आहेत. तर ठाकरेंकडून माजी आमदार महादेव बाबर तयारी करत आहेत. त्यांनी लोकसभेला अमोल कोल्हे यांच्या प्रचारात स्वतःला अक्षरशः झोकून दिले होते. त्यामुळे उमेदवार कोण असणार? एवढाच प्रश्न आहे.

इकडे वडगाव-शेरीमध्ये पवारांकडून माजी आमदार बापू पठारे यांच्यासारखा नेता लढताना दिसू शकतो. ते सध्या भाजपमध्ये आहेत. तरीही निवडणुकीच्या राजकारणात भाजपकडून त्यांना हा मतदारसंघ सुटणे अवघडच आहे. इथे ठाकरेंकडून माजी नगरसेवक संजय भोसले तयारी करत आहेत.

लक्ष्मण हाकेंशी सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा; सायंकाळी 5 वाजता सरकारची बैठक, हाके उपोषण सोडणार?

कसब्यात काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला जाऊ शकतो. पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये माजी आमदार रमेश बागवे यांचे नाव आघाडीवर आहे. शिवाजीनगरमध्ये दत्तात्रय बहिरट यांना संधी मिळण्याची चिन्ह आहेत. इथे दिवंगत माजी आमदार विनायण निम्हण यांचे पुत्र सनी निम्हण हे संधी मिळेल त्यापक्षाकडून लढू शकतात.

खडकवासल्यामध्ये शरद पवार यांच्याकडून यंदाही सचिन दोडके यांनाच संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. गतवेळी त्यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. पर्वतीमधून पवारांकडे सध्या तरी तगडा असा उमेदवार नाही. मात्र ऐनवेळी ते सरप्राईज पॅकेज म्हणून …. यांना उतरवू शकतात.

सगळ्या महत्वाचे म्हणजे भाजप डोळे झाकून जिंकणारा मतदारसंघ अशी ओळख असलेला कोथरुड हा ठाकरेंच्या वाट्याला जाऊ शकतो. इथून ठाकरे हे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे किंवा माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांना मैदानात उतरवू शकतात. थोडक्यात महाविकास आघाडीने भाजपचा बालेकिल्ला खालसा करण्याचे फुलप्रफ प्लॅनिंग केले आहे हे नक्की. आता हा प्लॅन कितपत यशस्वी होतो हे येत्या काही दिवसातच कळून येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज