पोंक्षे पिता-पुत्रांच्या चित्रपटाचे नाव जाहीर; काय जबरदस्त घेऊन येणार? प्रेक्षक उत्सुक

पोंक्षे पिता-पुत्रांच्या चित्रपटाचे नाव जाहीर; काय जबरदस्त घेऊन येणार? प्रेक्षक उत्सुक

Sharad Ponkshe and his sons film name announces : काही दिवसांपूर्वीच अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र यावरील पडदा आता उठला असून ‘बंजारा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय.

मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खडसेंवर पलटवार

चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.

सर्वाधिक पेपरफुटी ठाकरेंच्या काळात; बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळा…; फडणवीसांनी सगळचं काढलं

मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर शरद पोंक्षे ‘बंजारा’चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की !

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात ‘बंजारा’चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा ‘बंजारा’ असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच.’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज