Shilpa Shetty Dance: ‘बहरला मधुमास’ गाण्यावर चक्क शिल्पा शेट्टी देखील थिरकली, Video व्हायरल

Shilpa Shetty Dance: शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर यातल्या ‘बहरला हा मधुमास’ (baharala ha madhumas) हे गाणं प्रचंड हिट झाले आहे. सोशल मीडियावर (Social media) तर या गाण्यावर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T145142.741

Shilpa Shetty Dance

Shilpa Shetty Dance: शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर यातल्या ‘बहरला हा मधुमास’ (baharala ha madhumas) हे गाणं प्रचंड हिट झाले आहे. सोशल मीडियावर (Social media) तर या गाण्यावर डान्सच्या रील्सने वेडच लावले होते.


आश्चर्य म्हणजे केवळ मराठी नाही तर हिंदी चाहत्यांनी या गाण्यावर जोरदार ताल धरला आहे.बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील ‘बहरला मधुमास’ वर डान्स करण्याचा मोह आवरलेला नाही. सध्या सगळ्यांना ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याने चांगलीच भुरळ पाडली आहे. इन्स्टाग्रामवर तर या गाण्याचा सध्या जोरदार धुमाकूळ घातला आहे.

भारतातच नाही तर सातासमुद्रापार देशात देखील या गाण्यावर डान्स स्टेप करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर आता बॉलिवूडची ‘धडकन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील बहरला मधुमास गाण्यावर डान्स करण्यास भाग पाडले आहे. शिल्पाने अगदी तशीच स्टेप करत मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

Salman Khan धमकीप्रकरणी मोठी अपडेट; मेल प्रकरणी एका विद्यार्थ्याविरुद्ध लुकआउट नोटीस

शिल्पाला मराठी गाण्यावर डान्स करत असल्याचे बघून चाहते खूप खूश झाले आहेत. यावेळी शिल्पाने येल्लो ऑकर रंगाचा कुर्ता आणि प्लाझो परिधान केले आहे. ज्यात शिल्पाचं सौंदर्य खूपच खुलून आले आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Exit mobile version