Download App

Shilpa Shetty दिसणार लेडी कॉपच्या भूमिकेत; ओटीटीवर डेब्यू करण्यास सज्ज

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच तिच्या आगळ्या-वेगळ्या भूमिका आणि फिटनेससाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वीचं ती सुखी या चित्रपट दिसली होती. त्यानंतर आता ती फर्स्ट लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून शिल्पा ओटीटीवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या चित्रपटात साकारणार भूमिका…

शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टीच्या आगामी कॉप युनिव्हर्समध्ये ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये झळकणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून शिल्पा ओटीटीवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एक वेबसिरीज असणार आहे. या आकर्षक शोमध्ये शिल्पा शेट्टी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून भारताच्या पोलिस दलासमोरील अनेक आव्हानं पेलण्यासाठी ती तयार आहे.

Khichdi 2: कीर्ती कुल्हारी अन् जेडी मजेठिया सांगितला ‘खिचडी 2’ सिनेमातील गाण्याचा अनुभव

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय सह-अभिनेता असलेली ही वेब सीरिज देशाच्या निर्भय आणि देशभक्त कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना सल्युट करणार आहे. शिल्पा एक पोलिस अधिकारी म्हणून तिची भूमिका साकारणार असून रोहित शेट्टीच्या सोबत ती OTT प्लॅटफॉर्म वर स्वतः चा ठसा उमटवणार यात शंका नाही. शिल्पाने नुकतचं तिच्या सोशल मीडिया हँडलवर रिलीजची तारीख जाहीर करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

Contract Recruitment चा निर्णय ‘हे’ मविआचे पाप…महाभकास आघाडीचा निषेध; म्हणत भाजप आक्रमक

यामध्ये शिल्पा म्हणाली की, अब सायरन बाजेगा तो समझो अपराध की बँड बाजेगी. आ गया पोलीस! #PoliceCommemorationDay वर आपल्या भारतीय पोलिसांना अभिवादन करताना हा शो त्यांच्या शौर्याला, निःस्वार्थ सेवेला, अटूट बांधिलकीला आणि उग्र देशभक्तीला श्रद्धांजली आहे. #IndianPoliceForceOnPrime, 19 जानेवारी @primevideoin वर.”

इंडियन पोलीस फोर्स ही रोहित शेट्टी पिक्चर्स द्वारे निर्मित आहे. आणि 19 जानेवारी 2024 पासून Amazon प्राइम वर रिलीज होणार आहे. शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या कॉपवर्समध्ये स्वतःचे वेगळे आकर्षण कसे आणते हे पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us