Khichdi 2: कीर्ती कुल्हारी अन् जेडी मजेठिया सांगितला ‘खिचडी 2’ सिनेमातील गाण्याचा अनुभव

Khichdi 2: कीर्ती कुल्हारी अन् जेडी मजेठिया सांगितला ‘खिचडी 2’ सिनेमातील गाण्याचा अनुभव

Khichdi 2: लेखक आतीश कपाडिया यांची ‘खिचडी’ ही मालिका सप्टेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. कलाकारांची विनोदी शैली आणि कथानक यांमुळे ही मालिका खूप लोकप्रिय झाली. शोमधील पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यानंतर खिचडी मालिकेतील भूमिकांवर आधारित एक सिनेमा 2010 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचे नाव खिचडी हेच होते. आता खिचडी2 या (Khichdi 2) सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. आता जेडी मजेठिया आणि कीर्ती कुल्हारी यांची केमिस्ट्री असलेले ‘वंदे राखा’ या गाण्याची झलक बघायला मिळणार आहे.

सध्या या गाण्याची शूटिंग स्वित्झर्लंडमध्ये सुरु असल्याची माहिती समोर आली. गाण्याच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने तिच्या अनुभव सांगितला. म्हणाली की, जेव्हा मी पहिल्यांदा वंदे राखा ऐकली तेव्हा गाण्याच्या प्रेमात पडले, नाचायला ते खूप छान गाणे वाटले. गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केल्यामुळे ते अगदी परिपूर्ण वाटले. मला असे वाटते की गाणे खूप सुंदरपणे तयार केले आहे आणि डान्स स्टेप्स खूप विलक्षण आणि मजेदारअसणार, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली.

तसेच गेल्या काही दिवसाखाली ‘खिचडी-2’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरमध्ये खिचडी सिनेमामधील कलाकार तसेच दिग्दर्शिका फराह खान देखील दिसत आहे. फराह खाननं खिचडी या सिनेमात देखील कॅमिओ केला होता. आता ती खिचडी-2 सिनेमात देखील काम करत आहे. टीझरमध्ये पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज दिसत आहे. या टीझरच्या शेवटी ‘खिचडी 2-मिशन पंथुकिस्तान’ असं लिहिल्याचे दिसत आहे. तसेच “या दिवाळीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये”, असंही या टीझरमध्ये लिहिलेलं आहे. प्रेक्षक खिचडी 2 सिनेमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Nakhrewaalii: आनंद एल राय यांच्या ‘नखरेवाली’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

कीर्ती कुल्हारीनं खिचडी-2 या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, “इस दिवाली, हंसी का धमाका सिनेमाघरो में” खिचडी 2 (Khichdi 2) या सिनेमात हंसा पारेख ही व्यक्तिरेखा सुप्रिया पाठक यांनी साकारली आहे. खिचडी या सिनेमामधील सुप्रिया पाठक यांच्या विनोदी शैलीनं अनेकांची मनं जिंकली होती. सुप्रिया पाठक कपूर, राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक, कीर्ती कुल्हारी आणि जमनादास मजेठिया हे कलाकार ‘खिचडी 2’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहेत.

अभिनेत्री निमिषा वखारिया (Nimisha Vakharia) यांनी खिचडी या सिनेमात जयश्री ही भूमिका साकारली होती. आता खिचडी-2 (Khichdi 2) सिनेमामधील ही भूमिका अभिनेत्री वंदना पाठक या साकारणार आहेत. प्रेक्षक ‘खिचडी 2’ या सिनेमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube