Contract Recruitment चा निर्णय ‘हे’ मविआचे पाप…महाभकास आघाडीचा निषेध; म्हणत भाजप आक्रमक

Contract Recruitment चा निर्णय ‘हे’ मविआचे पाप…महाभकास आघाडीचा निषेध; म्हणत भाजप आक्रमक

Contract Recruitment : कंत्राटी भरतीवरून (Contract Recruitment) सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तसेच या निर्णयामुळे सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र कंत्राटी भरतीचा फसवा निर्णय घेऊन लाखो बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा आज अहमदनगरमध्ये भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला.

Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम

कंत्राटी भरतीचा निर्णय हा तत्कलीन सरकारच्या काळातच झाला आहे. मात्र त्यांनीच घेतलेल्या निर्णयावरून ते आज आंदोलन करत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी माविआच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंत्राटी भरतीच्या निर्णयावरून आज भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले.

Udhav Thackery : …तर बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्या सारखं; ललित पाटील प्रकरणी ठाकरेंचा निशाणा

यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. दरम्यान कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले आहे. अशा या महाभकास आघाडीचा जाहीर निषेध यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला.

नगर तालुक्यातील देहरे गावात दारूचा महापूर, प्रशासनाचा कानाडोळा, गावकऱ्यांकडून आंदोलनचा इशारा

तसेच कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे शिवसेना (ठाकरे गट) कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. 2010 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 6000 कंत्राटी पदांचा जीआर काढला होता. यामध्ये, वाहन चालक, लेखा लिपिक, विशेष शिक्षक, साधन व्यक्ती, प्रकल्प समन्वय अशी पदे होती.

तसेच 2010 साली कॉंग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना शिक्षक कंत्राटी भरतीचा जीआर हा 14 जानेवारी 2011 ला काढण्यात आला. महाराष्ट्रात कंत्राटी भरतीचा गदारोळ केला जातो आहे. मात्र जे दोषी आहेत, तेच गदारोळ करीत आहेत. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलन प्रसंगी दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विठ्ठलराव लंघे, महेंद्र गंधे, बाळासाहेब सोनवणे, राजेंद्र नन्नवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube