Download App

Shiv Thakare: शिव ठाकरेचा जुहू बीचवरील साफसफाईचा व्हिडिओ पाहून चाहते भारावले!

Shiv Thakare Viral Video: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) कायम चर्चेत येत असतो. त्यानं मनोरंजन क्षेत्रात स्वतःची एक अनोखी अशी ओळख निर्माण केली आहे. सध्या तो ‘खतरों के खिलाडी १३’ बघायला मिळतं आहे. सध्या त्यानं जुहू बीचवर जाऊन साफसफाई केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमुळे शिवच्या कामाचं कौतुक केलं आहे.


तसेच सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर शिवचा जुहू बीचवरील साफसफाई करत असल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, शिव बीचवरील कचरा वेचत असल्याचे बघायला मिळत आहे. शिवाय शिवनं सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला हा व्हिडीओ शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. आपण एकत्र मिळून बदलू शकतो, असं त्यानं या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.

शिवच्या या व्हायरल व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. एका चाहत्यांनी लिहिलं आहे की, “शिव खूप चांगलं काम करतोय.” तर दुसऱ्याने शिव ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं आहे की, “कॅमेरासाठी करत असल्याचं काही लोकं प्रतिक्रियेत म्हणतं आहेत. परंतु तो तर काम करत आहे. तुम्ही लोकं घरात बसून काय करताय? हा कचरा तुम्हीच केला असेल. या निसर्गाची काय अवस्था केली आहे. आपण सगळ्यांनी यासाठी काम केलं पाहिजे.

Censor Board Certificate: खिलाडीनंतर किंग खानच्या ‘जवान’ला कात्री?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले बदल

कुठेही कचरा टाकूच नका. पुढच्या पिढीसाठी निर्सगाला वाचवा. दरम्यान शिवनं करिअरची सुरुवात ‘रोडिज’ या रिअ‍ॅलिटी शोपासून केल्याचे बघायला मिळाले आहे. यानंतर तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकला आणि विजेता देखील ठरला. परंतु त्यानं हिंदी ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश केला आणि तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

Tags

follow us