Khatron Ke Khiladi 13: शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी-13’ मध्ये होणार सहभागी; करणार खतरनाक स्टंट

Shiv Thakare Khatron Ke Khiladi: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पर्वात कोणते स्पर्धक असणार आहेत, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 22T153822.323

Shiv Thakare

Shiv Thakare Khatron Ke Khiladi: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पर्वात कोणते स्पर्धक असणार आहेत, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार आहे.


या कार्यक्रमासाठी शिव ठाकरेने तगडं मानधन घेतले जाते आहे. ‘खतरों के खिलाडी 13’च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असलयाचे सांगितले जात आहे. या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. आता मराठीसह हिंदी ‘बिग बॉस’ (Bigg Boss) गाजवणारा शिव ठाकरे आता ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये सहभागी होणारा पहिला स्पर्धक असल्याचे सांगितले जात आहे.

‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांनी नव्या पर्वात स्पर्धकांमध्ये शिव ठाकरेच्या नाव पुढे आले आहे. शिव ठाकरेच ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) विजेता असणार होता. पण काही कारणाने तो विजेता होऊ शकला नाही. ‘बिग बॉस 16’नंतर त्याला लगेचच शिवला ‘खतरों के खिलाडी 13’साठी विचारणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास शिव देखील तयार असलयाचे सांगितले जात आहे.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

‘खतरों के खिलाडी 13’च्या स्पर्धकांमधील शिव ठाकरे हा सर्वात महागडा स्पर्धक ठरलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिव ठाकरेची लोकप्रिय लक्षात घेत ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांनी त्याला मोठे मानधन दिले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एका एपिसोडसाठी त्याने ५-८ लाख रुपये घेतले असल्याचे सांगितले जात आहे.

‘बिग बॉस 16’च्या घरात शिव ठाकरे उत्कृष्ट खेळाडू होता. त्याची खेळी रोहित शेट्टी आणि निर्मात्यांच्या चांगलीच पसंतीस आली, आणि लगेचच त्यांनी त्याला ‘खतरों के खिलाडी 13’साठी विचारणा केली आहे. बिग बॉसच्या घरातील टास्क शिवने चांगले खेळले आहेत. ‘आपला माणूस’ म्हणून ओळख असलेला शिव कमी काळात लोकप्रिय झाला आहे. आता ‘खतरों के खिलाडी 13’ तो कसं खेळणार आहे, याकडे चाहत्यांचे मोठे लक्ष राहणार आहे.

Exit mobile version