Download App

Maharashtrachi Hasyajatra फेम शिवाली परब करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? पोस्ट शेअर करत म्हणाली…

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी सिरीयलपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) आहे. या कार्यक्रमाने सगळ्यांना चांगलेच वेड लावले आहे. सर्वसाधारण जनतेपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना या कार्यक्रमातील विनोद कधी ना कधी कुठे कुठे बोलत असताना दिसून येत असतात. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांचे लाखो चाहते आहेत. त्या सगळयांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच आतुर असतात. अशातच अभिनेत्री शिवाली परबने (Shivali Parab ) तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने (Social Media Post) सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.


शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिवाली खूप बोल्ड अंदाजामध्ये दिसून आली आहे. शिवालीने हिरव्या रंगाचा शिमरी टॉप परिधान केला आहे. तर तिचे हे फोटो एका कॅफेतले आहे. त्या फोटोमध्ये तिच्या हातात कॉफी मग आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हातात फुलं आहेत. तर तिसऱ्या आणि शेवटच्या फोटोत शिवाली आरशात बघत आहे. हे फोटो शेअर करत शिवालीने कॅप्शन दिले आहे की “मी माझ्या कॉफी पार्टनरची प्रतिक्षा करते…” शिवालीची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या पोस्टने सगळ्यांचे लक्ष हे तिच्या कॅप्शननं वेधलं आहे. शिवालीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक चाहता कमेंट करत म्हणाला की तू महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या शुटिंगची प्रतिक्षा करत आहेस का? तर दुसरा चाहता म्हणाला, खूप खूपचं सुंदर. तिसरा चाहता म्हणाला, अरे बापरे मरतो की काय मी. तर काही चाहत्यांनी शिवाली हे खरं आहे का? असा सवाल केला आहे. शिवालीच्या या पोस्टनं सगळ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की ती खरंच कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का?

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

दरम्यान शिवाली ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात विविध भूमिका साकारत असते. तिची प्रत्येक भूमिका ही चाहत्यांच्या पसंतीसही उतरते. शिवाली या शोमध्ये कशी आली तिला संधी कशी मिळाली हा सवाल अनेकांना पडला आहे. तर शिवालीने बदलापुरमध्ये एका महोत्सवात काम केले होते. त्यावेळी हास्यजत्रा फेम नम्रता संभेरराव आणि अरुण कदम हे त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत होते. त्यानंतर आगरी महोत्सव असल्यानं तिला तिथे आगरी भाषेत बोलायचं होतं ती भाषा त्यांच्या टीममधल्या मुलांना येत नव्हती, पण शिवालीला येत होती, त्यामुळे तिला नम्रतानं संधी दिली होती आणि त्यानंतर तिच्या अभिनयाला बघता नम्रतानं हास्यजत्रेसाठी तिचा रेफरन्स दिला होता.

Tags

follow us