Shivani Surve: गोव्याच्या किनाऱ्यावर शिवानी सुर्वेचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल…

Shivani Surve: बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2) मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी (Actress Shivani Surve) यंदाचं वर्ष खूपच खास दिसतंय. नुकताच तिचा ‘वाळवी’ (Vaali marathi Movie) हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचे नाव कायमच चर्चेत असतं. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T132410.973

Shivani Surve

Shivani Surve: बिग बॉस मराठी २ (Bigg Boss Marathi 2) मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी (Actress Shivani Surve) यंदाचं वर्ष खूपच खास दिसतंय. नुकताच तिचा ‘वाळवी’ (Vaali marathi Movie) हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचे नाव कायमच चर्चेत असतं. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहते.


शिवानी सुर्वे ही सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. शिवानी ही सध्या तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेसोबत छान ट्रीप एन्जॉय करत असल्याचे दिसून येत आहे. शिवानी आणि अजिंक्य सध्या गोवाच्या समुद्रकिनारी फिरत आहेत. नुकतंच अजिंक्यने दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही समुद्रकिनारी मस्त एन्जॉय करत असल्याचे दिसून येत आहे.


या व्हिडीओमध्ये अजिंक्य आणि शिवानी एकमेकांचा हात पकडून बाजूबाजूला बसल्याचे दिसत आहे. तर शिवानी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून फोटोसाठी पोज देत रस्त्याचे देखील दिसून येत आहे. यात त्याने स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचा नजारा देखील चाहत्यांना दाखवला आहे. “माझी अशी इच्छा आहे की आपण फुलपाखरे आहोत आणि तसेच जगायला हवे. पण उन्हाळ्याचे हे तीन दिवस जे मी तुझ्यासोबत पुढची ५० वर्षे सामान्य वर्षांपेक्षा जास्त आनंदाने जगलो आहे”, असे या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

तसेच शिवानीचा बॉयफ्रेंड अजिंक्य हा देखील एक अभिनेता आहे. त्याने अनेक सिरीयलमध्ये काम केलं आहे. त्याने ‘पावनखिंड’ सिनेमात शिवा काशीदची भूमिका साकारली होती. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या सीरियलमध्ये मुख्य भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

शिवानी आणि अजिंक्य गेल्या काही वर्ष एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्यांच्या नात्याची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Exit mobile version