मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतचं इम्तियज अलीचा बहुप्रतिक्षित चित्रपट चमकीलाचं शूटिंग पुर्ण केलं. या चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून परिणीती आणि दिलजीत पहिल्यांदाच एकत्र दिसमार आहेत.
या चित्रपटाचं शूटिंग पंजाबमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये परिणीती अमरजोत कौर ही भूमिका साकारणार आहे. तर दिलजीत चमकीलाच्या भूमिक्त दिसणार आहे. शूटिंग संपल्यानंतर दिलजीतने आपली सहकलाकार परिणीतीसाठी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट लिहिली. त्यामध्ये त्याने लिहिले की, ‘चमकिला चित्रपटात परिणीतीने आश्चर्यकारक काम केलं आहे.’
दुसरीकडे परिणीतीने देखील चित्रपटाची पुर्ण टीम आणि क्रूचे आभार व्यक्त केले. तिने तिच्या उन्होंने इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले का, ‘इम्तियाज सर, दिलजीत, टीम चमकिला… माझं आयुष्य कायमस्वरूपीसाठी बदललं आहे…. हा स्वर्गीय अनुभव होता. शांति, आनंद, मनन, पंजाब… हे मी कधीच विसरणार नाही.
Amitabh Bachchan यांना दुखापत, हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान घडली घटना
परिणीती चोप्राने इशकजादे, हंसी तो फंसी आणि द गर्ल ऑन द ट्रेन यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. त्यानंतर आता ती चमकीला आणि कैपुसले गिल मध्ये दिसणार आहे.