उंच स्वप्नांची गगनभरारी आणि निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास,‘चिकीझिंग’चा हृदयस्पर्शी व लक्षवेधी टिझर प्रदर्शित!
Chikizing ची जगभरातील १६ प्रतिष्ठित अशा पुरस्कारांसाठी अधिकृत निवड झाली असून, आजवर या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
Soaring journey of lofty dreams and unique voyage of innocent childhood heartwarming and captivating teaser of ‘Chikizing’ has been released : प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जपून ठेवलेल्या बालपणीच्या सोनेरी आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि स्वप्नांच्या अथांग आकाशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देणारा नवा कोरा कौटुंबिक चित्रपट ‘चिकीझिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. स्वतःच्या शाळेपेक्षा बाहेरच जास्त रमणारा एक अवखळ, चुणचुणीत आणि स्वप्नाळू मुलगा म्हणजे ‘चिक्या’; आणि आणि त्याचे बालसुलभ भावविश्व व स्वप्नपूर्ती ची रंजक धडपड रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. ‘चिकीझिंग’ची जगभरातील १६ प्रतिष्ठित अशा पुरस्कारांसाठी अधिकृत निवड झाली असून, आजवर या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा अत्यंत लक्षवेधी आणि मनाला भुरळ घालणारा टिझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा टिझर प्रदर्शित होताच अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, नेटकरी सोशल मीडियावर भावुक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत या टिझरचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
सुशिक्षित बेरोजगाराची धमाल गोष्ट उलगडणार! अंकुर वाढवेला लागली ‘कोलंबस”ची लॉटरी!
दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत ‘चिकीझिंग’ या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. या सुरेख कलाकृतीचे दिग्दर्शन राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी केले आहे. टिझरमध्ये निसर्गरम्य आणि धुक्याची चादर ओढलेल्या हिलस्टेशनच्या मनमोहक वातावरणाची सुरेख पार्श्वभूमी दिसते. दर शनिवारी आपल्या आईसोबत एका आलिशान निवासी शाळेच्या परिसरात जाणारा चिक्या त्या भव्यदिव्य परिसराने पार भारवून जातो. त्या शाळेचे बंद असलेले भव्य लोखंडी प्रवेशद्वार आणि त्याच्या आत दडलेले चकचकीत, समृद्ध जग हे त्याच्या चिमुरड्या मनासाठी एक न उलगडणारे स्वप्नवत विश्व ठरते. टिझरमधील मुलांची धम्माल, गलोलीने केलेले खेळ, साधीसुधी घरे, डोंगराळ भाग आणि चिक्याची गगनभरारी घेणारी नजर थेट काळजाला भिडते. ‘चला चला मामाच्या गावाला…’ या सुरेल गाण्याची जोड दिल्याने टिझर खऱ्या अर्थाने लक्षवेधी बनला आहे.
‘आदि अनंत’मधून उलगडणार ‘आजोबा -नातवाच्या गोड नात्याचे भावविश्व
या टीझरविषयी दिग्दर्शक म्हणाले की, ‘चिकीझिंग’चा हा टिझर केवळ चित्रपटाची पहिली झलक नसून, प्रेक्षकांना त्यांच्या हरवलेल्या बालपणाशी आणि निरागस स्वप्नांशी पुन्हा जोडून देणारा एक भावनिक सेतू आहे. हा टिझर चित्रपटाचा खरा आत्मा आणि चिक्याच्या विश्वाची नेमकी ओळख सर्वांसमोर प्रभावीपणे उलगडतो. या चित्रपटाचे संगीत आणि लवकरच रिलीज होणारी गाणी ही सर्व वयोगटातील रसिकांच्या पसंतीस उतरतील अशी आमची खात्री आहे. या रुपात आम्ही परिपूर्ण मनोरंजन करणारा कौटुंबिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असून तो नक्कीच रसिकांच्या मनाचा ठाव घेईल.
महागाईने खिसा रिकामा, नोकरीवरही संकट! महागाईला लगाम का लागत नाही? नोबेलविजेत्यांनी उलगडलं गणित
चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर या कलाकारांनी अत्यंत सशक्त आणि महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे संवेदनशील लेखन आणि कथा-पटकथा राजेंद्र बगाटे व वैभव कुलकर्णी यांनी लीलया पेलली आहे. छायांकनाची धुरा प्रवीण सोनावणे यांनी सांभाळत निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य कॅमेऱ्यात अचूक टिपले आहे. संगीताची सुमधुर बाजू श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी सजवली आहे. संकलनाची जबाबदारी शेखर गुरव आणि एस शंकर यांनी पार पाडली आहे. कला दिग्दर्शन आणि वेशभूषा सुरेश कुंभार यांनी चोख सांभाळली आहे. केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर अवघ्या कुटुंबाने एकत्र येऊन अनुभवावा असा हा स्वप्न, कुटुंब आणि आशेचा उत्सव असलेला ‘चिकीझिंग’ चित्रपट येत्या १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.