‘गोंधळ’च्या दिग्दर्शकाची नवीन कलाकृती!‘आभाळवृक्ष‘ लघुकथेचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Abhaalvriksha ‘गोंधळ’ साठी बेस्ट डायरेक्टर सिल्वर पिकॉक पुरस्कार प्राप्त करणारे संतोष डावखर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत.

Abhaalvriksha

New work by director of ‘Gondhal’heartwarming trailer of short story ‘Abhaalvriksha’ released : गोव्यामध्ये झालेल्या ५६व्या इफ्फीमध्ये ‘गोंधळ’ चित्रपटासाठी बेस्ट डायरेक्टर सिल्वर पिकॉक हा पुरस्कार प्राप्त करणारे संतोष डावखर आता एका वास्तववादी कथेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यांच्या ‘आभाळवृक्ष’ या नव्या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, समाजातील संवेदनशील विषय मांडण्याची त्यांची खास शैली या ट्रेलरमधून पुन्हा अधोरेखित होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेल्या ‘गोंधळ’नंतर येणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे.

काही राशींना संधीच संधी तर काहींना प्रतिकुल दिवस! कसं आहे आजचं राशीभविष्य जाणून घ्या…

‘आभाळवृक्ष’च्या ट्रेलरमध्ये दुष्काळग्रस्त गावाचे वास्तव प्रभावीपणे उभे केले आहे. कोरडी पडलेली जमीन, पाण्यासाठीची झुंज, आभाळाकडे आशेने पाहाणारे शेतकरी आणि पावसाच्या प्रतीक्षेत दिवसागणिक वाढणारी हतबलता या सगळ्या भावनांचा तीव्र अनुभव ट्रेलरमध्ये येतो. मात्र या सगळ्यात एक प्रतीक म्हणून उभा राहाणारा ‘आभाळवृक्ष’ विशेष लक्ष वेधून घेतो. गावकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचे, श्रद्धेचे आणि पावसाशी जोडलेल्या भावनिक नात्याचे ते जणू एक जिवंत रूप भासते. त्या वृक्षाभोवती फिरणारी भावनिक धाग्यांची गुंफण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ही शॉर्ट फिल्म त्या परिस्थितीत जगणाऱ्या माणसांच्या मनातील भावविश्वही उलगडते. पावसावर अवलंबून असलेले आयुष्य, कुटुंबाची जबाबदारी आणि आशा-निराशेच्या सीमारेषेवर उभे राहिलेले जगणे ‘आभाळवृक्ष’मध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. तसेच यात ओस पडणारी गावं, वाढणारं शहरीकरण याच्यावर सुद्धा भाष्य करण्यात आल्याचं जाणवतेय. ‘आभाळवृक्ष’ मध्ये शरद जाधव मुख्य भूमिकेमध्ये तर कैलास वाघमारे, पुनम चौधरी, संजय लकडे, प्रभाकर मठपती राम बेंद्रीकर व सुनील देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही शॅार्ट फिल्म २० एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’कडून ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “दुष्काळामुळे ओस पडत चाललेली गावं आणि तरुणाईचं शहराकडे वाढणार आकर्षण हा गावकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय आहे. मी नेहमीच अशा कथा सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्या समाजाच्या वास्तवाशी जोडलेल्या आहेत. ‘आभाळवृक्ष’ ही खेङेगावातल्या माणसांच्या आशेची आणि प्रतीक्षेची कहाणी आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या माणसाला जगण्याची उभारी देतात आणि त्या भावनेला आम्ही या चित्रपटातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकसुद्धा या ट्रेलरमधून त्या भावनेशी जोडले जातील ही अपेक्षा आहे.”

मुळा धरण, एमआयडीसी, वांबोरी चारी हे सर्व कर्डिलेंचे स्वप्न पूर्ण करणार; राहुरीतील सभेत फडणवीसांची ग्वाही

संतोष डावखर नेहमीच आशयघन, वास्तववादी आणि समाजाशी थेट जोडणारे विषय हाताळण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत एक सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा दृष्टिकोन दिसून येतो. याआधी त्यांच्या ‘अज्ञात’ या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, ज्यामुळे शॉर्ट फिल्म माध्यमातही त्यांनी आपली मजबूत छाप उमटवली आहे.

आपसातील शेतजमीन वाटपावर नोंदणी शुल्क नाही; महसूल मंत्री बावनकुळेंचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘आभाळवृक्ष’ या लघुपटाचे दिग्दर्शन व निर्मिती संतोष डावखर यांनी केले असून दीक्षा डावखर सह-निर्मात्या आहेत. तसेच कथा, पटकथा व संवाद राम बेंद्रीकर यांचे आहे. या शॉर्टफिल्मचे डिओपी अमोघ देशपांडे असून संपादन रोहन कपूर यांनी केले आहे. तर निर्मिती रचना रवीन कराडे यांची आहे, निशांत रामटेके यांचे पार्श्वसंगीत लाभलेल्या या शॉर्टफिल्मची ध्वनी रचना जयेश धाकण यांची आहे. तसेच ‘धुरंदर’ फेम जस्टीन जोस यांनी री- रेकॉर्डिंग केले आहे.

follow us