Download App

श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरच्या ‘कपकपी’ या आगामी थ्रिलर सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Kapkapi Motion Poster: ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या कॉमिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संगीत सिवन एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. यावेळी त्याच्या टीममध्ये श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि तुषार कपूर (Tushar Kapoor ) यांचा समावेश असणार आहे. ‘कपकपी’ (Kapkapi Movie) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट हास्यासोबतच काहीशी भीती आणि थरार निर्माण करणारा चित्रपट असणार आहे. निर्मात्यांनी गुरुवारी ‘कपकपी’चे मोशन पोस्टर देखील शेअर केले.

जयेश पटेल (Jayesh Patel) यांच्या ब्राव्हो एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली ‘कपकपी’ची (Kapkapi Motion Poster) निर्मिती करण्यात आली आहे. लेखकांबद्दल बोलायचे झाले तर सौरभ आनंद आणि कुमार प्रियदर्शी आहेत. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सध्या निर्मात्यांनी सिनेमाची आणखी रिलीज डेट जाहीर केलेली नाही.

‘कपकपी’बद्दल अभिनेता काय म्हणाला?

श्रेयस तळपदेनेही ‘कपकपी’बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणाला की, “‘कपकपी’ हा एक वेगळा चित्रपट आहे. आजकाल अनेक थ्रिलर किंवा देशभक्तीपर चित्रपटांचा ट्रेंड सुरू असताना, आम्ही एक खरा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन आलो आहोत, जो चाहत्यांना पोट धरून हसायला लावणार आहे.

Mirzapur 3: मुन्ना भैया ‘मिर्झापूर 3’ मध्ये दिसणार नाही, कारण आलं समोर

‘कपकपी’ चित्रपटातील कलाकार

तुषार कपूर आणि श्रेयस तळपदे व्यतिरिक्त, चित्रपटात सोनिया राठी, सिद्धी इदनानी, जय ठक्कर, वरुण पांडे, धीरेंद्र तिवारी, दिनेश शर्मा आणि अभिषेक कुमार यांचा समावेश असणार आहे.

follow us

वेब स्टोरीज