Shweta Tiwari : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री श्वेता तिवारीने इन्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत ऑनलाइन शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्सचा सामना करावा लागला असल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणात तिने मनेस प्रमुख राज ठाकरे यांना देखील काही प्रश्न विचारले आहे. श्वेताने दावा केला आहे की, तिला इन्स्टाग्रामवर काही जण स्वत:ला मराठी आणि राज ठाकरे यांचे समर्थक असल्याचं सांगत शिवीगाळ करत आहे.
या प्रकरणाबाबत श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर लिहिले की, आज मला एका अशा विषयावर बोलायचं आहे, जो अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. सोशल मीडियावर आता खूप सामान्य झाला आहे की, एखाद्या महिलेला शिवीगाळ करणं. कोणतीही महिला असो, तिचं वय काहीही असो, ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो.. कोणत्याही पार्श्वभूमीचा पुरुष तिला सोशल मीडियावर येऊन शिवीगाळ करु शकतो. मला ज्या गोष्टीचा सर्वाधिक धक्का बसतो ती म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरणारे पुरुष हे अशिक्षित किंवा वाईट परिस्थितीतून आलेले असतीलच असं नाही. त्यापैकी अनेकजण सुशिक्षित असतात.ते प्रतिष्ठित कुटुंबातून आलेले दिसतात. त्यांच्या घरी पत्नी, आई, मुली आणि बहिणी देखील असतात. तरीही देखील त्यांना दुसऱ्या महिलेबद्दल विचार करताना सर्वांत अपमानास्पद शब्द वापरण्यात त्यांना कोणतीही अडचण वाटत नाही असं तिने या स्टोरीवर लिहिले आहे.
या स्टोरीच्या दुसऱ्या पोस्टमध्ये तिने तिला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या युजर्सच्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, दुसऱ्या महिलेशी अशा पद्धतीने बोलल्यानंतर तुम्ही घरी जाऊन तुमच्या कुटुंबाचा सामना कसा करता? विशेष म्हणजे ही व्यक्ती राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक असल्याचंही दिसतंय. इथून हा विषय माझ्यासाठी खूप वैयक्तिक होतो. मी माझं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात घालवलं आहे. माझे वडील मुंबईत वाढले. लहानपणापासून मी मराठी माणूस असण्याशी जोडलेला अभिमान आणि प्रतिष्ठा पाहिली आहे. मराठी संस्कृती महिलांचा, त्यांच्या सामर्थ्याचा आणि त्यांच्या सन्मानाचा आदर करते असा माझा विश्वास होता. त्यामुळे जेव्हा स्वत:ला अभिमानाने मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या सोशल मीडिया डीएमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करतात.
पाकिस्तानकडून साखर खरेदी? पाकिस्तानी कारखानदारांची सरकारकडे मोठी मागणी-
तेव्हा मला खरंच प्रश्न पडतो की, मराठी माणूस असण्याचा अर्थ आता हाच झाला आहे का? राज ठाकरे, जर असे लोक तुमचे समर्थक असतील तर मला खरंच जाणून घ्यायचं आहे की, तुम्हाला त्यांचं हे वर्तन मान्य आहे का? कारम मराठी बोलणं, स्वत:ला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं एवढंच पुरेसं नाही. महिलांचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे असं देखील श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीत स्पष्ट केलं आहे.
