Download App

Siddharth Anand: ‘फायटर’च्या किसिंग सीनबद्दल दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले…

Siddharth Anand: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने चांगली कामगिरी केली. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटावरूनही गदारोळ झाला आहे. चित्रपटातील दीपिका आणि हृतिकच्या किसिंग सीनवरून वाद सुरू आहे. यासाठी निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. आता दिग्दर्शकाने यावर मौन सोडले आहे.

‘फायटर’मधील हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या लिपलॉक सीनने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. पण, या दृश्यावरून चित्रपटगृहाबाहेर वाद निर्माण झाला. यावर आक्षेप घेत आयएएफ (IAF) अधिकाऱ्याने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता सिद्धार्थ आनंदने खुलासा केला आहे की, ज्या नावाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे त्या नावाची कोणतीही व्यक्ती आयएएफमध्ये काम करत नाही.

एका दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) सांगितले आहे की, ‘ज्याने या सीनवर आक्षेप घेतला आहे आणि आयएएफ अधिकारी असल्याचा दावा केला आहे, त्याची आम्ही चौकशी केली आहे. त्यांनी सांगितले की IAF अंतर्गत अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे हे काम कोणी केले हे आम्हाला माहीत नाही. आम्ही अशा व्यवसायात आहोत जिथे अनेक प्रकारच्या सामाजिक टिप्पण्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची पूर्णपणे सवय झाली आहे.

शाहिदचा चित्रपट येताच ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

हवाई दलाने चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन दिले: पुढे, सिद्धार्थ आनंद म्हणाले की, हे ‘फायटर’ पूर्णपणे आयएएफच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत त्यांचे पूर्ण योगदान आहे. तसेच निर्मात्यांनी त्याची परवानगी घेऊनच त्याचे शूटिंग केले आहे. दिग्दर्शकाने सांगितले की हा चित्रपट आयएएफसोबत काळजीपूर्वक प्रक्रियेतून गेला आहे. त्यासाठी त्यांना प्रथम सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले आणि हा चित्रपट हवाई दलालाही दाखवण्यात आला. फायटरने त्यांच्याकडून स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले आहे.

follow us