Sidharth Jadhav Answered on Marathi and South Film Industry comparison : दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील (South Film Industry) तीन-चार चित्रपट सोडले. तर किती चित्रपट मोठे झाले आहेत? असं म्हणत अभिनेता सिद्धार्थ जाधव (Sidharth Jadhav) याने मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या होणाऱ्या तुलनेवर (comparision) प्रतिक्रिया दिली आहे.
कोणताच बदल होणार नाही! महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडेच; चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील चित्रपट जगभरात आपलं स्थान निर्माण करत आहेत. त्यावरून हिंदीसह मराठी चित्रपट सृष्टीतील चित्रपटांशी देखील त्या चित्रपटांची तुलना केली जाते. याच तुलनेवर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सडतोड उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने हे उत्तर दिलं आहे.
Government Schemes : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल?
यावेळी बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, दक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपट देखील पॅन इंडिया लेव्हलवर दाखवले जात आहेत. दक्षिणेतील देखील अनेक चित्रपट केवळ त्यांच्या राज्यांपुरतेच मर्यादित आहेत. त्यातील काही निवडक चित्रपट यामध्ये आरआरआर, पुष्पा आणि केजीएफ यांची नाव घेता येतील. तेच केवळ जगभरात गाजले आहेत.
त्यावरून दक्षिणात्य चित्रपट सृष्टी आणि मराठी चित्रपट सृष्टीची तुलना करणे अवघड आहे. तसेच मराठी चित्रपटांची स्पर्धा ही हिंदी किंवा दक्षिणात्य चित्रपटांशी नसून जागतिक पातळीवर आहे. तर भारतातील सर्व चित्रपटसृष्टी एक कुटुंब आहे. त्यामुळे त्यांची एकमेकांशी तुलना किंवा स्पर्धा असू शकत नाही हे मान्य केले पाहिजे अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ दिली.