Chandrayan 3 च्या यशानंतर सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट; ‘आनंद Harry (Potter) पोटात माझ्या…’
Chandrayan 3 Sidharth Jadhav : भारताचे चांद्रयाना 3 (Chandrayan 3 ) ने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यात मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ( Sidharth Jadhav) याने एक खास पोस्ट करत थेट परदेशातून आपला आनंद आणि देशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
Seema Deo: पाहताच क्षणी प्रेमात पडले, अन्…अशी सुरु झाली सीमा देव यांची लव्हस्टोरी
काय म्हणाला सिद्धार्थ जाधव?
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Sidharth Jadhav) सध्या परदेशात म्हणजे इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये गेलेला. त्या दरम्यान भारताचे चांद्रयानाने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. त्यावर त्याने इन्स्टाग्रावर आपला आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्त म्हणाला की, ‘चंद्रायान-3 मोहीम यशस्वी… india 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 आनंद Harry (Potter) पोटात माझ्या मावेना… सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस 🇮🇳 सर्व सन्मानीय भारतीय श्यास्त्रज्ञ व कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा..!’ या पेस्टमध्ये त्याने त्याचा लंडन शहरातील पॅलेस थिएटर समोर उभा आहे. ज्याचं नाव हॅरि पॉटर अन्ड द कर्स चिल्ड इन लंडन असं आहे.
आता चंद्रावर पुढं काय घडणार ?
दरम्यान आता विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. त्यानंतर प्रज्ञानने चंद्राच्या जमिनीवर फेरफटका मारला, अशी माहिती देणारे ट्विट इस्त्रोने केले आहे. चांद्रयानाचे दोन महत्वाचे भाग आहेत. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर. काल सायंकाळी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर आता या लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले आहे. रोव्हर सहा चाकी रोबोटिक वाहन आहे. जे चंद्राच्या जमिनीवर फिरणार आहे. येथील जमिनीचे फोटो काढणार आहे.
विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर चार तासांनी प्रज्ञान रोव्हर बाहेर आले. या रोव्हरचा वेग प्रति सेकंद एक सेंटीमीटर असा राहिल. कॅमेऱ्यांच्या मदतीने चंद्रावरील गोष्टींचे रोव्हरवर स्कॅनिंग केले जाईल. हा रोव्हर चंद्रावरील हवामानाचीही माहिती देणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या आयन आणि इलेक्ट्रॉनचे प्रमाणही शोधणार आहे.