Seema Deo: पाहताच क्षणी प्रेमात पडले, अन्…अशी सुरु झाली सीमा देव यांची लव्हस्टोरी

Seema Deo: पाहताच क्षणी प्रेमात पडले, अन्…अशी सुरु झाली सीमा देव यांची लव्हस्टोरी

Ramesh Deo Seema Deo Love Story: सिनेसृष्टीतली ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. (Seema Deo Passes Away) वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनी याबद्दलची माहिती ट्विट करुन दिली आहे. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडेही सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती. मनोरंजनसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या सीमा देव यांची लोकप्रियता आजपर्यंत कायम आहे.

सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावर जितकी चाहत्यांच्या आवडीची तितकंच खऱ्या आयुष्यातही त्यांनी खऱ्या अर्थानं सहजीवनाचा आदर्शच सर्वांपुढं ठेवल्याचं पाहायला मिळालं. एव्हरग्रीन सेलिब्रिटी जोडी म्हणूनही या दोन्ही कलाकारांकडं पाहिलं जातं होतं. अनेक सिनेमामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. ‘आनंद’ या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आज देखील चाहत्यांच्या स्मरणात आहे.

सीमा देव या मराठी आणि हिंदी मनिराजंसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० हून जास्त सिनेमात काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती.  त्या दोघांची पहिली भेट देखील खूपच रंजक होती. सीमा सिनेमामध्ये काम मिळावे, म्हणून फिल्मीस्थानमध्ये ऑडिशन देण्यासाठी त्यांच्या आईबरोबर चर्नी रोडवरून लोकलमधून आल्या होत्या.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यावेळी सीमा फक्त १५ वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या आईची साडी घालून आणि डोक्यामध्ये मोगर्‍याचा गजरा माळून ऑडिशनसाठी आल्या होत्या. तर दुसरीकडे ग्रँटरोडवर रमेश देव त्याच लोकलमध्ये होते. त्यावेळी ‘आंधळा मागतो एक डोळा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असल्याने रमेश देव यांना लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली होती. या सिनेमात रमेश यांची खलनायकाची भूमिका साकारली होती.

सीमा यांनी त्यांना पाहताक्षणी ओळखले आणि त्यांच्या आईला सांगितले होते. हेच ‘आंधळा मागतो एक डोळा’ सिनेमामधील दुष्ट खलनायक आहेत. यावर त्यांच्या आईने त्यांना रागावून ‘त्यांच्याकडे बघू नको’ असे सांगितले होते. तसेच सीमा यांनी लावलेल्या मोगर्‍याच्या गाजऱ्याचा संपूर्ण डब्यात सुगंध पसरला होता. रमेश आणि सीमा देव यांची हीच पहिली भेट होती. पहिल्या भेटीत रमेश सीमा यांच्या प्रेमात पडले होते. ‘सुंदर मुलगी आहे, आता हिला पाटवायचे, असेच त्या वेळी माझ्या मनात आल्याचे’ रमेश देव प्रांजळपणे कबूल केल्याचे बघायला मिळाले होते.

Girish Oak Post: अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

रियल-लाइफ कपलने तब्बल ७३ सिनेमामध्ये नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे. या दोघांचे अनेक सिनेमा पडद्यावर आले आणि चाहत्यांना  दोघांची जोडी खूप आवडली. या काळात दोघांनी १९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’ हा सिनेमा देखील केला होता. सिनेमाच्या कथानकानुसार, सीमा यांना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करत असल्याचे बघायला मिळाले होते. रमेश यांचे पात्र प्रेमात पडते. हा तोच सिनेमा होता, ज्यातून दोघांना एकमेकांबद्दलचे प्रेम वाटू लागले आणि त्याच वर्षी दोघांनी देखील नात्याचा विलंब न लावता लग्न केल्याचे बघायला मिळाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube