ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. 1957 च्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला. (Veteran actress Seema Deo passed away)
सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ होते. अभिनेत्री रमेश देव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सीमा देव बनल्या. एव्हरग्रीन सेलिब्रिटी जोडी म्हणूनही या दोन्ही कलाकारांकडं पाहिलं जातं होतं. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावर जितकी प्रेक्षकांच्या आवडीची तितकंच खऱ्या आयुष्यातही त्यांनी खऱ्या अर्थानं सहजीवनाचा आदर्शच सर्वांपुढं ठेवल्याचं पाहायला मिळालं. गतवर्षीच फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचे निधन झाले आहे.
सीमा देव या मराठी आणि हिंदी मनिराजंसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० हून जास्त सिनेमात काम केले आहे. आनंद’ या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आज देखील चाहत्यांच्या स्मरणात आहे. पण गेल्या काही दिवसापासून त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती.
सीमा-रमेश देव यांची भेटही होती रंजक :
सीमा-रमेश देव या दोघांची पहिली भेट देखील खूपच रंजक होती. सीमा सिनेमामध्ये काम मिळावे, म्हणून फिल्मीस्थानमध्ये ऑडिशन देण्यासाठी त्यांच्या आईबरोबर चर्नी रोडवरून लोकलमधून आल्या होत्या. त्यावेळी सीमा फक्त 15 वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या आईची साडी घालून आणि डोक्यामध्ये मोगर्याचा गजरा माळून ऑडिशनसाठी आल्या होत्या. तर दुसरीकडे ग्रँटरोडवर रमेश देव त्याच लोकलमध्ये होते. त्यावेळी ‘आंधळा मागतो एक डोळा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असल्याने रमेश देव यांना लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली होती. या सिनेमात रमेश यांची खलनायकाची भूमिका साकारली होती.
सीमा यांनी त्यांना पाहताक्षणी ओळखले आणि त्यांच्या आईला सांगितले होते. हेच ‘आंधळा मागतो एक डोळा’ सिनेमामधील दुष्ट खलनायक आहेत. यावर त्यांच्या आईने त्यांना रागावून ‘त्यांच्याकडे बघू नको’ असे सांगितले होते. तसेच सीमा यांनी लावलेल्या मोगर्याच्या गाजऱ्याचा संपूर्ण डब्यात सुगंध पसरला होता. रमेश आणि सीमा देव यांची हीच पहिली भेट होती. पहिल्या भेटीत रमेश सीमा यांच्या प्रेमात पडले होते. ‘सुंदर मुलगी आहे, आता हिला पाटवायचे, असेच त्या वेळी माझ्या मनात आल्याचे’ रमेश देव प्रांजळपणे कबूल केल्याचे बघायला मिळाले होते. रियल-लाइफ कपलने तब्बल ७३ सिनेमामध्ये नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे.