Download App

A R Rahmanच्या असोसिएशनला धाडली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची नोटीस

A R Rahman: मध्यंतरी एका लाईव्ह शोच्या (Live show) दरम्यान झालेल्या राडामुळे ए आर रेहमान हा जोरदार चर्चेत आला होता. परंतु आता तो पुन्हा एकदा  चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे, (Social media) ते म्हणजे एका वेगळ्याच कारणासाठी. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एआर रेहमान यांनी ASICON कायदेशीर नोटीस दिली .


या नोटीसमध्ये संगीत दिग्दर्शकाचा मानहानीचा आरोप (Allegation ) करण्यात आला. रेहमान यांनी मानहानीसाठी १० कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली जात आहे,  असा आरोप सध्या केला जात आहे. २०१८ मध्ये रहमान संस्थेच्या ७८ व्या वार्षिक संमेलनामध्ये परफॉर्म करणार होते आणि त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. यासाठी रेहमान यांनी आगाव म्हणून घेतलेले २९.५ लाख रुपये देखील परत केले नसल्याची माहिती समोर आली.

तसेच एआर रेहमान यांची वकील नर्मदा संपत यांनी चार पानी उत्तर देत असतं या प्रकरणी केलेल्या आरोप फेटाळून लावले असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या नोटिसमध्ये एआर रेहमानने असोसिएशनशी एकदाही कोणताही प्रकारचा करार केला नसल्याचे सांगितले आहे. परंतु तरी देखील प्रसिद्धीसाठी त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगितले जात आहे.

मोठी बातमी : महादेव ऑनलाइन लॉटरी प्रकरणी ईडीचे रणबीर कपूरला समन्स; 6 ऑक्टोबरला होणार चौकशी

एवढेच नव्हे तर रेहमान यांना यासाठी एडवांस म्हणून कोणत्याही प्रकारचे पैसे मिळाली नसल्याचा दावा यामध्ये केला जात आहे. तसेच रेहमान यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, ते केवळ मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु रेहमान यांना १५ दिवसांच्या आत १० कोटी रक्कम द्यावी असंही नोटिसमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us