मोठी बातमी : महादेव ऑनलाइन लॉटरी प्रकरणी ईडीचे रणबीर कपूरला समन्स; 6 ऑक्टोबरला होणार चौकशी

  • Written By: Published:
मोठी बातमी : महादेव ऑनलाइन लॉटरी प्रकरणी ईडीचे रणबीर कपूरला समन्स; 6 ऑक्टोबरला होणार चौकशी

Mahadev betting app case : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ झाली असून, ऑनलाइन गेमिंग प्रकरणी ईडीने रणबीरला समन्स बजावले आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात चौकशी होणार असून, रणबीर कपूरला मोठी रक्कम मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. (Actor Ranbir Kapoor summoned by ED )

 

काय आहे नेमकं प्रकरण?

महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपमध्ये मनी लाँड्रिंगबद्दल (Money laundering) एका भव्य लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडिया आला होता. हा व्हिडीओ मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नसोहळ्यामधील होता. मुख्य आरोपी हा ॲपच्या संस्थापकांपैकी असल्याचे देखील समोर आले आहे. सौरभ चंद्रकरच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे देखील समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी संबंधित सेलिब्रिटींच्या चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे.

Prarthana Behre: प्रार्थना बेहरेचं नवऱ्याविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाली,’ नवरा मला रोज…’

महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. त्या दरम्यान त्यांनी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. आता सध्या 14 बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर असल्याचे बघायला मिळत आहे.

महादेव ऍपचे संस्थापक असे 4 ते 5 जण हे ऍप्स चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. फक्त देशातच नाही तर, परदेशामध्ये देखील ऍपचे कॉल सेंटर असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये ऍपचे कॉल सेंटर आहेत. याप्रकरणात नेमकं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावल्यामुळे सध्या सोशल मिडीयावर तो चर्चेचा विषय बनला आहे. तसेच ६ ऑक्टोबर दिवशी अभिनेत्याची चौकशी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube